मराठी इंडस्ट्रीची मेलेडी क्वीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 01:50 AM2016-03-27T01:50:39+5:302016-03-27T01:50:39+5:30
ओल्या सांजवेळी, अप्सरा आली, मथुरेच्या बाजारी, का कळेना कोणत्या क्षणी, अशी एकसो एक गाण्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिकाच्या मनावर अधिराज्य केले आहे.
ओल्या सांजवेळी, अप्सरा आली, मथुरेच्या बाजारी, का कळेना कोणत्या क्षणी, अशी एकसो एक गाण्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिकाच्या मनावर अधिराज्य केले आहे.
हे गाणे बेला शेंडे या गायिकेच्या आवाजात रसिकांपर्यंत पोहोचले. तसेच बॉलीवूडमध्ये या तगड्या गायिकेने जोधा अकबर, आय, पहेली या बिगबजेट चित्रपटांमध्येदेखील आपला आवाज दिला आहे. मराठी आणि बॉलीवूडमध्ये मेलेडी गाण्यांना अविस्मरणीय बनविणारी मराठी इंडस्ट्रीची मेलेडी क्वीन बेला शेंडे ही ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना म्हणाली, माझ्यासाठी ही खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट असून, आनंदाची बाब आहे. मेलेडी गाणे गाण्यास प्रत्येक गायकाला आवडते. कारण मेलेडी गाणी रसिकांच्या मनात जास्त काळ टिकतात. या गाण्यांवर पाय थिरकत नाही पण मन थिरकते. आता तर, लावणीमध्येदेखील मेलेडी ऐकण्यास मिळते.