पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:51 PM2024-10-30T12:51:45+5:302024-10-30T12:52:52+5:30
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरही या आजाराने ग्रासलेला आहे. याचा खुलासा एकदा त्यानेच केला होता.
पंखा सुरू झाल्यावर तो आपल्या अंगावर पडेल अशी अनेकांना भीती वाटते. पण तुम्हालाही असं वाटत असेल तर आताच सावध व्हा. कारण हा एक प्रकारचा आजार आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरही या आजाराने ग्रासलेला आहे. याचा खुलासा एकदा त्यानेच केला होता.
अनेक वर्षांपासून अर्जुन या आजाराने त्रस्त आहे. हायपोकॉन्ड्रियासिस (Hypochondriasis) असं या आजाराचं नाव आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की तो कधीही आजारी पडू शकतो किंवा त्याच्यासोबत काही दुर्घटना घडू शकते. तो सतत फक्त आजारांचाच विचार करत असतो. या आजाराबद्दल जाणून घेऊया...
हायपोकॉन्ड्रियासिस म्हणजे काय?
हायपोकॉन्ड्रियासिस म्हणजेच हायपोकॉन्ड्रिया इलनेस एंजाइटी डिसऑर्डर, जो दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. यामध्ये, निरोगी असूनही, व्यक्तीला काही गंभीर आजार किंवा अपघाताची भीती वाटते. जर त्याला आधीच काही आजार असेल तर त्याची प्रकृती बिघडू शकते. किरकोळ आजारही त्याला मोठा वाटू शकतो. वाढत्या वयाबरोबर त्याची भीती आणि तणाव वाढत जातो, ज्याचा त्याच्या आयुष्यावर आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो.
हायपोकॉन्ड्रियासिसची लक्षणं काय आहेत?
- तब्येतीची खूप काळजी असणं.
- लहान आजारांनाही मोठा आजार समजणं.
- सतत डॉक्टरांकडे जाणं.
- आरोग्याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं.
- गरज नसतानाही औषधं घेणं
- कोणत्याही आजाराचा रिपोर्ट नॉर्मल असला तरी मृत्यूची भीती.
- एका डॉक्टरचा रिपोर्ट नॉर्मल आल्यावर दुसऱ्या डॉक्टरकडे जाणे
- नेहमी आजारांबद्दल बोलणं
- इंटरनेटवर किंवा पुस्तकांमध्ये त्यासंबंधित गोष्टींबद्दल वाचणं.
- लोकांना भेटणं टाळणं.