#MeToo: विपुल शाहने तीन महिने मला नुसते छळले! एल्नाज नौरोजीचा आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 12:53 PM2018-10-19T12:53:14+5:302018-10-19T12:53:36+5:30

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या आरोप झेलणा-यांमध्ये आता दिग्दर्शक विपुल शाह याचेही नाव समाविष्ट झाले आहे. 

#MeToo: actress Elnaaz Norouzi accuses Namaste England's director Vipul Shah of sexual misconduct | #MeToo: विपुल शाहने तीन महिने मला नुसते छळले! एल्नाज नौरोजीचा आरोप!!

#MeToo: विपुल शाहने तीन महिने मला नुसते छळले! एल्नाज नौरोजीचा आरोप!!

googlenewsNext

मीटू’ मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाच्या आरोप झेलणा-यांमध्ये आता दिग्दर्शक विपुल शाह याचेही नाव समाविष्ट झाले आहे. इराणी अभिनेत्री आणि मॉडेल एल्नाज नौरोजी हिने विपुल शाहवर मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.


मिड डेने याबाबतचे वृत्त दिले आहे. विपुल शाहचा ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट कालचं रिलीज झाला. या पार्श्वभूमीवर एल्नाजने गंभीर आरोप केले आहेत. ‘विपुल शाह मला ‘नमस्ते इंग्लंड’मध्ये घेणार होता. विपुल मला या चित्रपटात सेकंड लीड म्हणून घेऊ इच्छितो, असे सांगितले गेले़. आधी ही आॅफर जॅकलिन फर्नांडिसला दिली गेली होती. पण तिने नकार दिला, असेही मला सांगण्यात आले. यानंतर मी विपुलला भेटले. त्या भेटीत हा रोल मलाच मिळणार, असे विपुलने मला भासवले. शिवाय यासाठी लुक टेस्ट आणि काही पेपर साईन करावे लागतील, असे मला सांगितले. वर्सोवा बिचवर माझे आॅडिशनही झाले. काही दिवसानंतर विपुल शाहने मला फोन करून आॅफिसमध्ये भेटायला बोलवले. आपण लवकरच पेपर साईन करू अशीही खात्री दिली. चर्चा झाल्यानंतर मी आॅफिसातून निघत असतानाच विपुल माझ्या जवळ आला आणि अचानक त्याने माझ्या गालावर किस केला. या भेटीनंतर विपुल मला त्याच्या चित्रपटात घेणार, असे मला वाटले. पण विपुलने कुठलाही संपर्क केला नाही. मी स्वत:हून विचारणा केल्यावर पुन्हा आॅडिशन घ्यावे लागेल, असे मला सांगण्यात आले. मी तयार झाले. पण या आॅडिशनमध्ये जणू मी जगातली सगळ्यात वाईट अभिनेत्री आहे, अशी वागणूक मला दिली गेली. पुढे  या ना त्या कारणाने विपुलने मला त्याच्या आॅफिसात बोलवले गेले. मी दुसºयांदा त्याला भेटायला गेले. तेव्हाही त्याने मला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला धक्का देत दूर केले. पण त्याने यासाठी माझी माफी मागितली नाही. मी शूटबद्दल विचारल्यावर तो मला टाळू लागला   यानंतर पुन्हा मी एक आॅडिशन दिले. याही भेटीत त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मी कामासाठी विदेशात असताना त्याने मला पुन्हा आॅडिशनसाठी पटियालाला बोलवले. याहीवेळी त्याने तेच केले. तीन महिने त्याने मला प्रचंड मानसिक त्रास दिला,’असे एल्नाजने म्हटले आहे.

Web Title: #MeToo: actress Elnaaz Norouzi accuses Namaste England's director Vipul Shah of sexual misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.