#MeToo : लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर यशराज फिल्म्समधून आशिष पाटील यांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 04:58 PM2018-10-16T16:58:33+5:302018-10-16T17:05:00+5:30
महिलांसोबत होणा-या लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात देशभर सुरू असलेल्या ‘मीटू’ मोहिमेने आणखी जोर धरला आहे. याचमुळे यशराज फिल्म्सने एक मोठा निर्णय घेत आशिष पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
महिलांसोबत होणा-या लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात देशभर सुरू असलेल्या ‘मीटू’ मोहिमेने आणखी जोर धरला आहे. याचमुळे यशराज फिल्म्सने एक मोठा निर्णय घेत आशिष पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आशिष पाटील यांना व्हाईट प्रेसिडन्ट- ब्रँड पार्टनरशिप आणि टॅलेंट मॅनेजरमेंट, बिझनेस व क्रिएटीव्ह हेड पदावरून त्वरित बडतर्फ करण्यात येत असल्याचे यशराज फिल्म्सने आज जाहीर केले.
— Yash Raj Films (@yrf) October 16, 2018
एका महिलेने आशिष पाटीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘२०१६ मध्ये मी आशिष पाटील यांना ईमेल टाकला होता. काही दिवसानंतर त्यांनी मला व्हॉट्सअॅवर मॅसेज केला. यादरम्यान यशराजच्या आॅफिसमध्ये भेटण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले़ मी भेटायला गेले. आधी आशिष पाटील यांनी माझ्याशी अगदी सामान्य चर्चा केली. यानंतर अचानक चल, आपण ड्राईव्हला जाऊ असे म्हणून ते उभे झाले. मी त्यांच्यासोबत गेले़ पण नंतर त्यांनी पब्लिक प्लेसमध्ये असे फिरणे योग्य नाही म्हणून मला त्यांच्या घरी नेले. येथे माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, ’ असे या महिलेने म्हटले होते.
#MeToo Sharing an anonymous survivor account of a former model and former aspiring actress who has spoken against @patilashish of YashRaj Films of sexually exploiting her. Screenshots are with her consent. #TimesUppic.twitter.com/jMe7Yzx5hB
— Japleen Pasricha (@japna_p) October 10, 2018
अर्थात आशिष पाटील यांनी हे आरोप फेटाळले होते. मात्र यशराजने या आरोपाची गंभीर दखल घेत, आशिष यांना बडतर्फ केले. ‘आम्ही यशराज फिल्म्समध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देऊ इच्छितो. यशराजमध्ये येणाºया प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटावे, ही आमची जबाबदारी आहे,’असे यशराज फिल्म्सने लिहिले आहे.