Tanushree Dutta Controversy : तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणी आता होणार डेजी शाहची चौकशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 01:17 PM2018-11-28T13:17:24+5:302018-11-28T13:19:28+5:30
तनुश्री दत्ता- नाना पाटेकर या वादाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अभिनेत्री डेजी शाहला समन्स बजावले आहे.
तनुश्री दत्ता- नाना पाटेकर या वादाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अभिनेत्री डेजी शाहला समन्स बजावले आहे. तनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्या गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह इतर आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.याच प्रकरणात आता डेजीला पोलिसांच्या चौकशीस सामोरे जावे लागणार आहे. साक्षीदाराच्या स्वरुपात डेजीचे बयान नोंदवले जाईल. यानंतरच या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करतील.
२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर एका गाण्याच्या शूटींगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप तनुश्रीने केला होता. या तक्रारीनंतर मुृंबईच्या ओशिवरा पोलिसांनी नाना पाटेकर , गणेश आचार्य यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. यावेळी तनुश्रीने आपल्याकडे सबळ पुरावे आणि साक्षीदार असल्याचा दावा केला होता. या साक्षीदारांच्या यादीत अभिनेत्री डेजी शाह हिचे नाव असल्याचे मानले जात आहे.
Tanushree Dutta harassment complaint against Nana Patekar matter: Mumbai Police has summoned actor Daisy Shah to record her statement. Shah was the assistant choreographer in 2008 when the song of the movie 'Horn Ok Please' was being recorded'
— ANI (@ANI) November 27, 2018
डेजीने २०१४ मध्ये सलमानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. मग २००८मध्ये ती ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर काय करत होती, असा विचार अनेकजण करत असतील. पण आम्ही सांगू इच्छितो की, त्या दिवशी ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर डेजी शाह हजर होती. अर्थात अभिनेत्री म्हणून नव्हे तर गणेश आचार्यची सहाय्यक म्हणून. होय, हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी डेजी डान्सर होती. ‘हॉर्न ओके प्लीज’मध्ये ती कोरिओग्राफर गणेश आचार्यला असिस्ट करत होती. रिहर्सलदरम्यान नानाचा स्पर्श तनुश्रीला कथितरित्या आवडला नव्हता. डेजीने याबाबत गणेश आचार्यकडे कथितरित्या तक्रार केली होती. पण यावर काही कारवाई करण्याऐवजी गणेश आचार्यने तिला शांत बसण्याचा सल्ला दिला, असे कळते. आता हे सगळे डेजी पोलिसांसमक्ष सांगते का, हे लवकरच कळेल.