#MeToo: तिने म्हटले ते ब्रह्मवाक्य; माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? आलोक नाथ यांनी सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:52 PM2018-10-09T12:52:32+5:302018-10-09T12:54:22+5:30

टीव्ही व बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. आलोक नाथ यांनी या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

#MeToo: #MeToo: Alok Nath to react on Vinta Nanda's allegations of sexual assault | #MeToo: तिने म्हटले ते ब्रह्मवाक्य; माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? आलोक नाथ यांनी सोडले मौन

#MeToo: तिने म्हटले ते ब्रह्मवाक्य; माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? आलोक नाथ यांनी सोडले मौन

googlenewsNext

टीव्ही व बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या व लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. 

‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत आलोक नाथ यांनी या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्ही मला का विचारता? मला विचारण्यापेक्षा आरोप लावणाऱ्या व्यक्तिलाच विचारा ना? महिलेने म्हटले की ते ब्रह्म वाक्य आहे ना? तेच सत्य आहे. माझी बाजू जाणून तुम्ही काय करणार? तुम्हाला जे काही लिहायचे ते लिहा. शेवटी मी काहीही सांगितले तरी माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? तिने (विनता नंदा)जे काही सांगितले, ते तिची हिन मानसिकता दर्शवते. माझ्यावर आरोप तर लागलेत, पण काही दिवसांतचं सगळे काही स्पष्ट होईल,’असे आलोक नाथ म्हणाले. तुम्ही विनता नंदा यांनी लावलेले सगळे आरोप फेटाळत आहात का? असे विचारले असता, ‘मी ना आरोप फेटाळतो आहे; ना ते मान्य करतो आहे. बलात्कार तर झाला असेल. निश्चितपणे झाला असेल. पण तो मी नाही, दुस-या कुणी केला असेल़. मला यापेक्षा अधिक काहीही बोलायचे नाही. आता हे प्रकरण बाहेर आलेच आहे तर दूरपर्यंत जाईल,’असेही आलोक नाथ म्हणाले.
विनता नंदा यांनी या प्रकरणाबद्दल त्यांनी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची गंभीर दखल घेत सीआयएनटीएएचे सुशांत सिंह यांनी ट्विट करत, आलोकनाथ यांना कारणे दाखवा नोटीस जारी केले आहे.

Web Title: #MeToo: #MeToo: Alok Nath to react on Vinta Nanda's allegations of sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.