#MeToo: हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीमनेही शेअर केली आपली ‘मीटू’ स्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:08 AM2018-10-16T10:08:41+5:302018-10-16T10:10:32+5:30
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी आपआपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली असताना आता बॉलिवूडमधील पुरूषही या मुद्यावर बोलत आहेत. अभिनेता साकिब सलीम यांनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी आपआपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली असताना आता बॉलिवूडमधील पुरूषही या मुद्यावर बोलत आहेत. कालच अभिनेता सैफ अली खान याने आपली ‘मीटू’ कहाणी सांगितली. २५ वर्षांपूर्वी करिअरच्या सुरूवातीला माझेही शोषण झाले होते. अर्थात ते शारीरिक नव्हते. पण आजही त्याबद्दल विचार केला की, मन संतापाने भरून येते, असे तो म्हणाला होता. सैफ अली खान पाठोपाठ अभिनेता साकिब सलीम यांनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. २१ व्या वर्षी एका पुरूषाने माझे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता, असे साकिबने एका दैनिकास दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ‘त्यावेळी मी नवे नवे करिअर सुरू केले होते. मी केवळ २१ वर्षांचा होता आणि एका पुरूषाने माझे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्याने अचानक त्याचा हात माझ्या पँन्टमध्ये घातला. हे पाहून मी उखडलो आणि त्याला लगेच बाजूला केले. त्या व्यक्तिचे नाव मी घेणार नाही. पण त्या घटनेने मी घाबरलो होतो. अर्थात मी आता ती घटना पूर्णपणे विसरलो आहे. पण प्रत्येकाचे असे नसते. अशा घटनांचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होतो,असे साकिब सलीम म्हणाला.
साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.