#MeToo: अनेक नाव माझ्यासाठी धक्कादायक; ‘मीटू’वर बोलला ए. आर. रेहमान!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:39 AM2018-10-23T11:39:16+5:302018-10-23T11:40:05+5:30
‘ मीटू’ मोहिमेअंर्तगत रोज नव-नवे खुलासे होत आहेत. लैंगिक शौषण, गैरवर्तनाचे आरोप झेलणाऱ्यांची नावे अनेकांसाठी धक्कादायक आहेत. आता संगीतकार ए. आर. रेहमान ...
‘मीटू’ मोहिमेअंर्तगत रोज नव-नवे खुलासे होत आहेत. लैंगिक शौषण, गैरवर्तनाचे आरोप झेलणाऱ्यांची नावे अनेकांसाठी धक्कादायक आहेत. आता संगीतकार ए. आर. रेहमान यानेही ‘मीटू’वर प्रतिक्रिया दिली आहे. ए आर रेहमानने ट्विटरवर याविषयीची आपली भूमिका मांडली. ‘मीटू’ मोहिमेवर मी गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून आहे. यातील अनेक नावं माझ्यासाठी धक्कादायक आहेत. यात पीडित आणि आरोप झेलणारे दोन्हींची नावे आहेत. मनोरंजन क्षेत्र स्वच्छ असले पाहिजे, असे माझे मत आहे. माझ्या इंडस्ट्रीत महिलांचा सन्मान झालेला पाहायला मला आवडेल. पीडित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. मी आणि माझे सहकारी सर्वांनाच सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
— A.R.Rahman (@arrahman) October 22, 2018
सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहण्याचा सल्लाही त्याने दिला आहे. सोशल मीडिया पीडितांना बोलण्याची संधी देतो. पण ही नवी इंटरनेट न्याय व्यवस्था घडवताना त्याचा गैरवापर होणार नाही, याबद्दल आपण सर्वांनीच दक्ष राहायला हवे, असेही त्याने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘मीटू’ मोहिमेने मनोरंजन विश्वातील वातावरण ढवळून निघाले आहे. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर ‘मीटू’ मोहिमेला बळ मिळाले आहे. अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या घटना मांडत अनेकांचे खरे चेहरे जगासमोर आणले आहेत. यात ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ, अनु मलिक, कैलाश खेर, साजिद खान, विकास बहल अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे.