#MeToo : सोनूवर उखडली सोना? पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:45 AM2018-12-20T11:45:45+5:302018-12-20T11:46:43+5:30
पार्श्वगायक सोनू निगम अलीकडे ‘मीटू’ मोहिमेवर भरभरून बोलला. इतकेच नाही तर त्याने ‘मीटू’च्या आरोपांत अडकलेले संगीतकार अनु मलिक यांचाही जोरदार बचाव केला. सोनूच्या नेमक्या वाक्यांवर सोनू मोहपात्रा उखडली.
पार्श्वगायक सोनू निगम अलीकडे ‘मीटू’ मोहिमेवर भरभरून बोलला. इतकेच नाही तर त्याने ‘मीटू’च्या आरोपांत अडकलेले संगीतकार अनु मलिक यांचाही जोरदार बचाव केला. कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप लावणे कितपत योग्य आहे. अनु मलिक खरे तर खूप काही बोलू शकतात. पण ते बोलले नाहीत. समजा मी म्हटले की, तुम्ही माझ्यासोबत गैरवर्तन केले तर तुम्ही सर्वात आधी पुरावे मागणार. पुरावे तर नाहीत ना. तरिही आपण अनेकांची नावं खराब करत आहोत. अशा प्रकरणात तुम्ही एखाद्याला बॅन कसे करू शकता? एखाद्याच्या तोंडचा घास कसा पळवू शकता? एखाद्याच्या कुटुंबाची छळ कसा करू शकता? असे सोनू म्हणाला होता.
So much sympathy for a millionaire losing work? So much empathy for his privileged family being ‘tortured’?How about the scores of girls & women he tortured?Multiple testimonies not proof enough?
— SONA (@sonamohapatra) December 19, 2018
“Sonu Nigam backs Anu Malik on #MeToo: Where is the proof?” https://t.co/xGajdQQfT8
सोनूच्या नेमक्या वाक्यांवर सोनू मोहपात्रा उखडली. मग काय, सोशल मीडियावर तिने सोनू निगमला चांगलेच धारेवर धरले. एका कोट्याधीशाचे काम गमावल्यावर इतकी सांत्वना? ज्याच्या कुटुंबाकडे असंख्य विशेषाधिकार आहेत, त्याच्याबद्दल इतका पुळका? त्या तमाम महिला आणि मुलींचे काय, ज्यांच्याशी गैरवर्तन झाले? इतक्या मुलींनी केलेले आरोप त्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत का? अशा शब्दांत सोनाने सोनूवर प्रहार केला.
I always found Sonu Nigam to be brighter than most of his peers, intelligent, so talented, excellent at his craft & yes, kind too. Feel so let down hearing him talk like this & choose the dark side to side up with. I’m hoping he realises how sad this is. 🙏🏽🔴 https://t.co/aQxiD2VdUx
— SONA (@sonamohapatra) December 19, 2018
सोनू इतरांच्या तुलने अधिक प्रतिभावान आहे, हे मला माहित आहे. अधिक बुद्धिजीवर, अधिक प्रतिभावान आहे. पण त्याला एका डागाळलेल्या व्यक्तिची बाजू घेताना पाहून दु:ख होतेय. आशा करते की, हे किती दु:खद आहे याची जाणीव त्याला होवो, असेही सोना म्हणाली.
‘मीटू’ मोहिमेदरम्यान अनु मलिक यांच्यावर आरोप करणारी सोना मोहपात्रा पहिली महिला होती. तिने अनु मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिच्याशिवाय श्वेता पंडितसह चार महिलांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले. या आरोपांची गंभीर दखल घेत, सोनी वाहिनीने मलिक यांची ‘इंडियन आयडॉन 10’च्या परीक्षक पदावरून हकालपट्टी केली होती.