#MeToo: तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी बोलतेय खोटे - गणेश आचार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:36 PM2018-11-22T17:36:07+5:302018-11-22T17:38:05+5:30

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर आरोप केल्यानंतर गणेश आचार्यने पुन्हा एकदा तनुश्रीला प्रत्युत्तर दिले आहे.

#MeToo: Tanushree Dutta speaks to hide his own mistakes - Ganesh Acharya | #MeToo: तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी बोलतेय खोटे - गणेश आचार्य

#MeToo: तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी बोलतेय खोटे - गणेश आचार्य

googlenewsNext
ठळक मुद्देतनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी करतेय खोटे आरोप - गणेश आचार्य

मीटू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर आरोप केल्यानंतर गणेश आचार्यने पुन्हा एकदा तनुश्रीला प्रत्युत्तर दिले आहे. तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचे गणेश आचार्यने म्हटले आहे.

तनुश्रीने गणेश आचार्य हा खोटारडा असून तो दुतोंडीदेखील आहे. त्याला माझ्यामुळे काम मिळले पण तो हे सोयीस्कररित्या विसरला आहे. त्याने माझा विश्वासघात केला आहे. नाना पाटेकर यांना गणेश आचार्य पाठिंबा असून तो नानाच्या कृतीत सहभागी होता असा आरोप केला होता. तनुश्रीच्या या आरोपानंतर गणेश आचार्यने हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने चुप्पी तोडली असून तनुश्री खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
हॉर्न ओके प्लीज सेटवर डान्सचा सराव सुरु असताना तो तनुश्रीला नीट जमत नव्हता. तिची ही चूक लपविण्यासाठी तिने मीटूच्या माध्यमातून साऱ्यांवर आरोप केल्याचे गणेश आचार्य यांनी वकिलांमार्फत जारी केलेल्या १२ पानांचे एक पत्र नमूद केले आहे. गणेश आचार्य म्हणाला की, २००८ मध्ये १७ ते २० मार्च या कालावधी शरीक हॉलमध्ये या गृप डान्सचा सराव सुरु होता. या गाण्यासाठी १०० डान्सर्सला कास्ट करण्यात आले होते. मात्र प्रत्येक सरावादरम्यान तनुश्री ना ना तऱ्हेचे बहाणे पुढे करत असते. त्यामुळे माझ्या असिस्टंटला देखील त्याचा त्रास झाला होता.
पुढे ते असेही म्हणाले, या डान्समध्ये आम्ही कोणतेही अश्लील किंवा असभ्य वाटतील अशा डान्स स्टेप बसविल्या नव्हत्या. त्यामुळे तनुश्री सपशेलपणे खोट बोलत आहे. #Metoo या मोहिमे अंतर्गत तनुश्रीने  २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या आरोप केला. त्यानंतर तिने गणेश आचार्यवर देखील आरोप केले होते.

Web Title: #MeToo: Tanushree Dutta speaks to hide his own mistakes - Ganesh Acharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.