कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावला मिका सिंग, प्रत्येकाला जवळ बोलवून दिले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 12:58 PM2021-05-14T12:58:02+5:302021-05-14T12:58:44+5:30

अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. सोनू सूद, सलमान खान, सारा अली खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर  यासारखे अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

Mika Singh Offers Money To Needy People On Mumbai Streets | कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावला मिका सिंग, प्रत्येकाला जवळ बोलवून दिले पैसे

कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावला मिका सिंग, प्रत्येकाला जवळ बोलवून दिले पैसे

googlenewsNext

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज लाखो लोकांना या कोरोना विषाणूची लागण होत आहे. या विषाणूमुळे किती तरी निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांमध्ये भीती वाढत असताना कोरोनाची भीषण परिस्थिती पाहून काही सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. 

कोरोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रत्येकालाचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहेत. अशा कठिण प्रसंगी  प्रत्येकजण जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहे. अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. सोनू सूद, सलमान खान, सारा अली खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर  यासारखे अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

अशात मिका सिंगही मैदानात उतरत नागरिकंची निस्वार्थ सेवा करत आहे. मिका गरजूंना चक्क पैसे वाटताना दिसला.मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मिकाला मध्येच एक अपंग व्यक्ती दिसतो त्याच्या जवळ जात विचारपुस करतो. सगळी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर किराणा त्याची घरी पोहचवला जाणार असेही मिका सांगताना दिसतोय. अनेकदा मिका अशा प्रकारे मदत करताना दिसतो.मध्यंतरी दिल्लीमध्ये गरजूंसाठी लंगर ठेवत जेवणाची व्यवस्था केली होती.सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे मिकाचे चाहते कौतुक करत आहेत.

Web Title: Mika Singh Offers Money To Needy People On Mumbai Streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.