घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा पडली प्रेमात, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:23 PM2021-06-16T17:23:03+5:302021-06-16T17:23:51+5:30
गतवर्षी अभिनेत्री मिनिषा लांबाचा घटस्फोट झाला. आता काय तर मिनिषा लांबा पुन्हा प्रेमात पडलीये.
गेल्या काही बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री मिनिषा लांबा (Minissha Lamba) गेल्यावर्षी अचानक तिच्या व पतीच्या घटस्फोटामुळे (Minissha Lamba Divorce) चर्चेत आली होती. त्याआधी गेल्या 2 वर्षांपासून मिनिषा तिचा पती रायन थामपासून वेगळी राहत होती. त्यानंतर गतवर्षी तिचा घटस्फोट झाला. आता काय तर मिनिषा लांबा पुन्हा प्रेमात पडलीये. होय, एका ताज्या मुलाखतीत खुद्द तिनेच हा खुलासा केला.
होय, मी एका प्रेमळ व्यक्तिच्या प्रेमात आहे. त्याच्यासोबत हॅपी रिलेशनशिपमध्ये आहे, असे मिनिषाने ‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मिनिषाच्या आयुष्यात आलेल्या या प्रेमळ व्यक्तिचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
या मुलाखतीत मिनिषा तिच्या घटस्फोबद्दलही बोलली. मतभेद असतील तर एकत्र राहण्यात अर्थ नाही. यात ना त्या दोन व्यक्तिंचा दोष असतो, ना परिस्थितीचा. काही गोष्टी खूप खासगी असतात. त्यावर बोलणे म्हणजे समोरच्याचा अपमान ठरतो. मी फक्त इतकेच म्हणेल की, रिलेशनशिप असो की लग्न, ते मोडले म्हणून आयुष्य संपत नाही. नेहमी तुमच्याजवळ प्रेमाचा दुसरा पर्याय असतोच. जो तुम्हाला तुमचा भुतकाळ विसरायला भाग पाडतो, असे ती म्हणाली.
6 जुलै 2015 रोजी मिनिषा व रायन लग्नबंधनात अडकले होते. गुपचूप उरकलेल्या लग्नसोहळ्यात अगदी मोजके लोक उपस्थित होते.
लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा कुठे मिनिषाने लग्न केल्याचे लोकांना कळले होते. 2018 मध्ये मिनिषा व रायन यांच्यात बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. मिनिषा पतीपासून वेगळी राहत असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र मिनिषाने यावर बोलणे टाळले होते. मात्र गतवर्षी अचानक तिने तिचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले होते.
मिनिषा व रायनची भेट मुंबईच्या एका नाईट क्लबमध्ये झाली होती. 2013 मध्ये दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर दोन वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. 2015 मध्ये त्यांनी लग्न केले होते.
2005 साली मिनिषाने सुजीत सरकारचा ‘यहां’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड आणि दस कहानियां सारख्या सिनेमांतही ती झळकली. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचना ए हसीनों’ सिनेमाने. 2017 मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा तिचा अखेरचा सिनेमात ती झळकली. यानंतर तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.
मिनिषाने फेशिअल सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला होता. प्लास्टीक सर्जरी करण्यापूर्वीचा तिचा सिनेमातला लूक आणि त्यानंतरचा लूकमध्ये पाहून अनेकांना धक्का बसला होता. यानंतरच्या काळात मिनिषाला चांगल्या आॅफर्स मिळणे बंद झाल्या. मिनिषा सिनेसृष्टीपासून कधी दुरावली हे तिलाच कळाले नाही.