Mirzapur 2 Dialogues: 'नेता जी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो' व्हायरल झाले १० धमाकेदार डायलॉग्स!
By अमित इंगोले | Published: October 23, 2020 02:27 PM2020-10-23T14:27:48+5:302020-10-23T14:29:07+5:30
गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही या वेबसीरीजमधील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. खासकरून कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू भैयाने या सीझनमध्ये धमाकेदार काम केलं आहे.
दोन वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर मिर्झापूर या वेबसीरीजचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे. अॅमेझॉन प्राइमवर शुक्रवारी ही वेबसीरीज रिलीज होणार होती. पण मेकर्सनी एक दिवसआधीच याचं स्ट्रीमिंग सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. यासोबतच 'मिर्झापूर २' चे सर्वच १० एपिसोड तुम्ही बघू शकणार आहात.
गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही या वेबसीरीजमधील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. खासकरून कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू भैयाने या सीझनमध्ये धमाकेदार काम केलं आहे. काही तासातच मिर्झापूर २ मधील डायलॉगही फेमस झाले आहेत. इंटरनेटवर अनेक डायलॉग व्हायरल झाले आहेत. यातीलच १० बेस्ट डायलॉग खालीप्रमाणे आहेत. (Mirzapur 2 Public Review: रिलीज होताच 'मिर्झापूर २' धमाका, प्रेक्षक म्हणाले - आतापर्यंतची बेस्ट सीरीज!)
- बातें ज्यादा हुई नहीं, बस आहट लेकर आ गए.
- शादीशुदा मर्द को अपनी स्त्री से भय न हो तो इसका मतलब है कि शादी में कुछ गड़बड़ है.
- औरत चाहे चंबल की हो या पूर्वांचल की, जब गन उठाई है तो इसका मतलब है कि दिक्कत में है.
- शर्मा से क्या शर्माना, दिस इज ए कॉमन डिजीज.
- कुछ लोग बाहुबली पैदा होते हैं और कुछ को बनाना पड़ता है, इनको बाहुबली बनाएंगे.
- दिखाते समय कॉन्फिडेंस हो तो पब्लिक पूछती नहीं कि फाइल में क्या है.
- जब कुर्बानी देने का टाइम आए तो सिपाही की दी जाती है. राजा और राजकुमार जिंदा रहते हैं , गद्दी पर बैठने के लिए.
- नेता जी बनना है तो गुंडे पालों, गुंडे मत बनो.
- गद्दी पर चाहे हम बैठें या मुन्ना नियम सेम होगा.
- हमारा उद्देश्य एक है... जान से मारेंगे... क्योंकि मारेंगे तभी जी पाएंगे.
मिर्झापूर २ दिग्दर्शन मिहीर देसाई आणि गुरमीत सिंहने केलं आहे. तर यात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाटी, राजेश तेलंग श्रिया पिळगावंकर, रसिका दुग्गल, कुलभूषण खरबंदा यांच्या भूमिका आहे. तसेच फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी या सीरीजची निर्मिती केली आहे. (भौकाल! मिर्झापूर २ रिलीज होताच फॅन्सची उडाली झोप, पहिल्या दिवशीच मीम्सचा धुमाकूळ...)