"अब भौकाल और बडा होगा!" 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:32 AM2024-10-28T11:32:51+5:302024-10-28T11:33:45+5:30

गाजलेल्या 'मिर्झापूर' वेबसीरिजचा आता सिनेमा येणार असून त्याविषयीचा व्हिडीओ समोर आलाय (mirzapuar)

mirzaur webseries now turn into movie starring pankaj tripathi ali fazal divyandu sharma abhishek banerjee | "अब भौकाल और बडा होगा!" 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

"अब भौकाल और बडा होगा!" 'मिर्झापूर' सिनेमाची घोषणा, 'या' दिवशी होणार सिनेमा रिलीज

पंकज त्रिपाठी, द्विवेंदू शर्मा, अली फजल यांची भूमिका असलेली 'मिर्झापूर' वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजमध्ये असलेलं प्रत्येक छोटं कॅरेक्टरही लोकांच्या पसंतीस उतरलं. 'मिर्झापूर' वेबसीरिजचा तिसरा भाग काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या तिसऱ्या सीझनलाही लोकांची चांगली पसंती मिळाली. 'मिर्झापूर'च्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. 'मिर्झापूर' वेबसीरिजचा आता सिनेमा येणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला आहे.

'मिर्झापूर' वेबसीरिजचा आता होतोय सिनेमा

'मिर्झापूर' वेबसीरिजचा पहिला सीझन लॉकडाऊनच्या काळात आला. या वेबसीरिजने अनपेक्षितरित्या सर्वांचं चांगलं प्रेम मिळवलं. 'मिर्झापूर'मधील कथानक आणि रक्तरंजित थरार प्रेक्षकांना चांगलाच आवडला. आता याच 'मिर्झापूर' वेबसीरिजचा सिनेमा येणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. पंकज त्रिपाठी, द्विवेंदू शर्मा, अली फजल आणि अभिषेक बॅनर्जी यांची भूमिका असलेला 'मिर्झापूर' सिनेमाविषयीचा खास प्रोमो रिलीज करण्यात आलाय. त्यामुळे 'मिर्झापूर'च्या चाहत्यांना चांगलाच आनंद झालाय. 


'मिर्झापूर' सिनेमाा या दिवशी होणार रिलीज

'मिर्झापूर' वेबसीरिजचा सिनेमा होणार असल्याची घोषणा करण्यात आली. "अब भौकाल और भी बडा होगा" अशी घोषणा करण्यात आलीय. यामध्ये शेवटी 'मिर्झापूर' सिनेमाच्या रिलीजची तारीख सांगण्यात आलीय. २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी वेबसीरिजप्रमाणे सिनेमाचीही निर्मिती करणार आहेत. गुरमीत सिंग या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे 'मिर्झापूर' सिनेमात कोणतं वेगळं कथानक पाहायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: mirzaur webseries now turn into movie starring pankaj tripathi ali fazal divyandu sharma abhishek banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.