Miss Universe 2021: हरनाजने घातला ३७ कोटी रुपयांचा हिरेजडीत ताज; Miss Universe ला बक्षीस स्वरुपात काय मिळतं माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 10:30 AM2021-12-14T10:30:00+5:302021-12-14T10:30:00+5:30

Miss Universe 2021: मिस युनिव्हर्सला बक्षीस स्वरुपात नेमकं काय काय मिळतं याविषयीची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

miss universe crown cost and what is the prize awarded to miss universe winner here all the details | Miss Universe 2021: हरनाजने घातला ३७ कोटी रुपयांचा हिरेजडीत ताज; Miss Universe ला बक्षीस स्वरुपात काय मिळतं माहितीये का?

Miss Universe 2021: हरनाजने घातला ३७ कोटी रुपयांचा हिरेजडीत ताज; Miss Universe ला बक्षीस स्वरुपात काय मिळतं माहितीये का?

googlenewsNext

सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत एकाच व्यक्तीची चर्चा सुरु आहे ती म्हणजे हरनाज संधू (Harnaaz kaur). तब्बल २१ वर्षांनंतर हरनाजमुळे भारताच्या शिरपेचात Miss Universe चा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तिच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे हरनाजने मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत बाजी मारल्यानंतर तिला ३७ कोटी रुपयांचा हिरेजडीत मुकूट घालण्यात आला. या मुकूटावर जवळपास ११७० हिरे बसवण्यात आले आहे. हरनाजचा हा मुकूट पाहिल्यानंतर विजेतेपद मिळाल्यानंतर मिस युनिव्हर्सला बक्षीस स्वरुपात नेमकं काय काय मिळतं याविषयीची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. त्यामुळे मिस युनिव्हर्स २०२१ हरनाज संधू हिला बक्षीसरुपात काय मिळालंय ते जाणून घेऊयात.

'ब्रेन विथ ब्युटी' या नावाने हरनाज सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आपल्या सौंदर्याच्या जोरावर Miss Universe पर्यंतचा प्रवास गाठणारी हरनाज केवळ २१ वर्षांची असून या वयात तिने मोठी मजल मारली आहे. त्यामुळे या वयात तिला नेमक्या कोणत्या गोष्टींनी गौरवण्यात आलं ते पाहुयात.

प्रत्येक वेळी बदलतो मिस युनिव्हर्सचा ताज?

हो. मिस युनिव्हर्सचा ताज हा प्रत्येक वेळी चेंज होतो. २०१९ मध्ये मिस युनिव्हर्सच्या ऑर्गनायझेशनच्या नव्या Mouawad Jewelry यांनी Mouawad Power of Unity Crown तयार केला होता. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमधील मिस युनिव्हर्सचा ताज पाहता यंदाच्या वर्षात सर्वाकत महागडा ताज हरनाजलाच मिळाला आहे. 

किती आहे मिस युनिव्हर्सच्या ताजची किंमत?

हरनाजला घालण्यात आलेल्या ताजची किंमत जवळपास ५ मिलियन युएस डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार, याची किंमत ३७ कोटींपेक्षा अधिक आहे.

काय खासियत आहे या ताजची?

हरनाजला मिळालेला ताज हा निसर्ग, सौंदर्य, स्त्रीत्व, एकता आणि ताकद या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन करण्यात आला आहे. या ताजमध्ये १८ कॅरेट गोल्ड, १७७० हिरे, सेंटरपीसमध्ये शील्ड-कट गोल्डन कॅनरी डायमंड आहे. या डायमंडचं वजन ६२.८३ कॅरेट आहे. या ताजमध्ये पानं, फुलांच्या पाकळ्या, वेली अशी डिझाइन करण्यात आली आहे.

मिस युनिव्हर्सला काय मिळालं?

मिस युनिव्हर्सला महागड्या ताजसोबत नेमकी किती रक्कम बक्षीस स्वरुपात मिळते याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. पण, ही रक्कम लाखोंच्या घरात असते असं सांगण्यात येतं.  तसंच मिस युनिव्हर्सला न्यूयॉर्कमधील मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची परवानगीही असते.

वर्ल्ड ट्रीप करतायेते मोफत

मिस युनिव्हर्सला असिस्टंट आणि मेकअप आर्टिस्टची एक टीम दिली जाते. ही टीम जवळपास १ वर्ष मिस युनिव्हर्सचा मेकअप, हेअर प्रोडक्ट, शूज, कपडे, ज्वेलरी, स्किनकेअर यांची काळजी घेतात. तसंच त्यांना मॉडलिंगसाठी पोर्टफोलियो तयार करण्यासाठी बेस्ट फोटोग्राफर्सही देतात. फेशनल स्टायल‍िस्ट, न्यूट्र‍िशन, डर्मटोलॉजी आणि डेंटल सर्व‍िसही मोफत मिळते.
दरम्यान, इतकंच नाही तर मिस युनिव्हर्सला वर्षभर एक्सक्युसिव्ह इवेंट्स, पार्टीज, प्रीमियर, स्क्रन‍िंग्स, कास्ट‍िंग्समध्ये एण्ट्री, प्रवासखर्च, हॉटेलचा खर्च मोफत केला जातो.
 

Web Title: miss universe crown cost and what is the prize awarded to miss universe winner here all the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.