Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:53 PM2024-10-08T17:53:01+5:302024-10-08T17:55:23+5:30

मनोगत व्यक्त करताना मिथुन दा यांनी आठवला संघर्षाचा काळ

Mithun Chakaraborty receives Dadasaheb Phalke lifetime achievement award | Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."

Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."

अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना चाहते प्रेमाने मिथून दा म्हणतात. डान्सिंग सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांना सिनेजगतातील सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीत आज ७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मिथुन दा यांना या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. 

दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, "मला याआधी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदा मिळाला तेव्हाचे त्याचे अनेक किस्से आहेत. पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा यश डोक्यात गेलं होतं. फिल्म इंडस्ट्रीत काळा रंग चालणार नाही असं मला म्हटलं गेलं. खूप अपमान झाला. तेव्हा विचार करायचो की मी काय करु. देवाला विचारायचो माझा रंग बदलू शकत नाही का? मग मी विचार केला की मी डान्स करु शकतो. मग मी ठरवलं की मी असा डान्स करेन की कोणाचंच लक्ष माझ्या काळ्या रंगाकडे जाणार नाही. मग मी बनलो सेक्सी, डस्की बंगाली बाबू. मी देवाकडे खूप तक्रार करायचो की मला सगळ्यासाठीच संघर्ष करायला लागतोय. आज हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी तक्रार करणं सोडून दिलं."

मिथुन चक्रवर्तींची कारकीर्द

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. कोलकातामधील बंगाली हिंदू कुटुंबात मिथुन यांचा जन्म झाला. पुण्यातील FTII मधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय. मृणाल सेन दिग्दर्शित 'मृग्या' या सिनेमातून मिथुन चक्रवर्तींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'डिस्को डान्सर' या सिनेमात मिथुन यांनी केलेला अभिनय आणि डान्स चांगलाच गाजला. या सिनेमातून 'डिस्को डान्सर' नावाने मिथुन यांना ओळखलं जाऊ लागलं. मिथुन यांनी अभिनयक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रही गाजवलंय. सध्या ते भारतीय जनता पार्टीत सक्रीय आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण, पद्माश्री पुरस्कारही मिळाला आहे. तसंच हा त्यांचा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे. 

Web Title: Mithun Chakaraborty receives Dadasaheb Phalke lifetime achievement award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.