'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 10:19 AM2024-10-04T10:19:29+5:302024-10-04T10:20:36+5:30

सूरज चव्हाणला सपोर्ट करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना वोट करण्याचं आवाहन केलंय (supriya sule, bigg boss marathi 5)

mla supriya sule support suraj chavan for bigg boss marathi 5 grand finale | 'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन

'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन

सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यापैकी जास्त चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणची. 'गोलीगत धोका', 'झापुकझुपक' म्हणणाऱ्या सूरज चव्हाणचा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर खूप चर्चा आहे. सूरजला फायनलमध्ये जिंकून देण्यासाठी सर्वांनीच कंबर कसलीय. अशातच सूरज चव्हाण बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत.

सुप्रिया सुळेंनी सूरजला वोट करण्याचं केलं आवाहन

खासदार सुप्रिया सुळेंनी सूरजला वोट करण्यासाठी सूरजला फेसबुकवर एक पोस्ट केलीय. सुप्रिया सुळेंच्या पोस्टमध्ये सूरजचा फोटो असून त्याखाली लिहिलंय की, "सूरज चव्हाण यास भरभरुन वोट देऊन मराठी बिग बॉसमध्ये महाविजेता करुयात!" याखाली नेते युगेंद्र पवार यांनी पोस्ट केलीय. त्यात त्यांनी लिहिलंय की, "आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्यांची क्रेझ वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये २७४ लोकांमधून अंतिम १६ मध्ये त्याची निवड झाली, हि आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे."


युगेंद्र पवार यांनी पुढे लिहिलंय की, "त्यामुळे आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून केवळ दोन मिनिटांचा वेळ काढून आपल्या लाडक्या सुरज चव्हाण यास वोट करून महाविजेता करण्यासाठी आपले योगदान देऊयात. त्यासाठी जिओ सिनेमा अप्लिकेशन इंस्टॉल करुन Big Boss Marathi या टॅबवर जाऊन Vote Now वर गेल्यावर सूरजच्या फोटोवर टच करुन आपलं वोट सबमिट करा, हि विनंती." 

Web Title: mla supriya sule support suraj chavan for bigg boss marathi 5 grand finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.