मोदींच्या 'मेक इन इंडिया'ला अजय अतूलची साथ

By Admin | Published: April 13, 2015 11:10 AM2015-04-13T11:10:22+5:302015-04-13T15:09:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेला आता संगीतकार अजय -अतूलची साथ मिळाली आहे.

Modi's 'Make in India' with Ajay Atul | मोदींच्या 'मेक इन इंडिया'ला अजय अतूलची साथ

मोदींच्या 'मेक इन इंडिया'ला अजय अतूलची साथ

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १३ -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेला आता संगीतकार अजय  -अतूलची साथ मिळाली आहे. मेक इन इंडिया मोहिमेसाठी जगभरातील उद्योजकांसमोर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अजय अतुलने संगीत दिले आहे. ऐवढ्या महत्त्वाच्या कामासाठी आमची निवड होणे ही गौरवास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया अजय - अतूलने दिली आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात मोदींनी मेक इन इंडिया मोहिमेला चालना देण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. रविवारी मोदींनी जर्मनीतील हॅनोव्हर येथे जगभरातून आलेल्या उद्योजकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा कार्यक्रम सादर झाला. १५ मिनीटाच्या या कार्यक्रमात विविध संस्कृतीने नटलेल्या भारताची  आधुनिकीकरण व मेक इन इंडिया मोहिमेपर्यंतची वाटचाल दाखवण्यात आली. या कार्यक्रमासाठी संगीत देण्याची जबाबदारी अजय - अतूलवर सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यक्रमात संगीतकार म्हणून आमची निवड होणे हे गौरवास्पद बाब होती असे अजय - अतूलने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. सुरुवातीला आम्हाला या कामासाठी विचारणा झाली तेव्हा आम्ही नकार दिला होता. कामाच्या व्यापामुळे आमच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही नम्रपणे नकारही कळवला होता. पण आम्ही नकार कळवण्यापूर्वीच पंतप्रधान कार्यालयाने आमचे नाव निश्चित केले होते. मग ऐवढी मोठी जबाबदारी नाकारणे आम्हाला योग्य वाटले नाही व शेवटी आम्ही महिनाभरात या कार्यक्रमासाठी संगीत तयार केले अशी आठवण अतूलने सांगितली. 
या कार्यक्रमात भारतातील विविध नृत्यप्रकारही सादर करण्याते आले होते. याशिवाय लेझर शोद्वारे साकारलेला मेक इन इंडिया मोहिमेतील वाघ हा कार्यक्रमाचा वैशिष्ट्य ठरला.  

Web Title: Modi's 'Make in India' with Ajay Atul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.