मोहनलाल साधासुधा गडी नाही...! रिलीजआधीच चित्रपटाची तब्बल 100 कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 02:35 PM2021-12-01T14:35:21+5:302021-12-01T14:36:57+5:30
Mohanlal’s Marakkar: Lion of the Arabian Sea : साऊथचा सुपरस्टार मोहनलालचा ‘मरक्कड: लायन ऑफ द अरेबियन सी’ हा सिनेमा उद्या गुरूवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय आणि प्रदर्शनाआधीच सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.
साऊथचा सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) व सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) ‘मरक्कड: लायन ऑफ द अरेबियन सी’ (Marakkar: Lion of the Arabian Sea ) हा सिनेमा उद्या गुरूवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय आणि प्रदर्शनाआधीच सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. होय, चित्रपट पाहण्यासाठी फॅन्स क्रेझी आहेत अणि अॅडव्हान्स बुकिंगमधूनच चित्रपटानं 100 कोटींचा गल्ला जमवला आहे.
खुद्द मोहनलाल यांनी ट्विट करत चित्रपटाच्या कमाईची माहिती दिली आहे. तमिळ, तेलुग, कन्नड आणि हिंदी अशा चार भाषांत प्रदर्शित होणारा हा शो 4100 स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे तब्बल 16 हजार शोज होणार आहेत.चित्रपटाने अॅॅडव्हान्स तिकिट बुकिंगद्वारे 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे, अशी माहिती मोहनलाल यांनी ट्विटमध्ये दिली आहे.
നാളെ ചരിത്ര ദിവസം കുഞ്ഞാലിയുടെയും മലയാള സിനിമയുടെയും #MarakkarFromDec2
— Mohanlal (@Mohanlal) December 1, 2021
Worldwide releasing in 4100 screens with 16000 shows per day.#MarakkarArabikadalinteSimham#MarakkarLionoftheArabianSeapic.twitter.com/BvWS0BeBU0
प्रियदर्शनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश तब्बल सात वर्षांनी मल्याळम चित्रपटात कमबॅक करत आहे. किर्तीने 2014 मध्ये ‘गितांजली’ या चित्रपटाद्वारे मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं.
मोहनलाल यांच्यासोबत अर्जुन सरजा, सुनील शेट्टी, मंजू वारियर आणि सिद्दिकी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
सुनील शेट्टीची तगडी भूमिका
सुनील शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटात धमाकेदार कमबॅक करतोय. ‘मरक्कड: लायन ऑफ द अरेबियन सी’मध्ये सुनील एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. यात तो एका योद्धा बनला आहे.
‘मरक्कड: लायन ऑफ द अरेबियन सी’ हा चित्रपट नेव्ही चीफ मोहम्मद अली उर्फ कुंजलि मरक्कड 4 यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि यातील सुनील शेट्टीचा लुक ‘ट्राय’ या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरित आहे. यात सुनील शेट्टीचे अनेक फाईट सीन्स दिसणार आहेत.