"आईने ऑस्करची ट्रॉफी टॉवेलमध्ये गुंडाळली कारण.."; ए.आर.रेहमान यांनी सांगितला भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 07:30 PM2024-05-22T19:30:40+5:302024-05-22T19:30:40+5:30
ए,आर.रेहमान यांनी त्यांच्या आईने ऑस्करची ट्रॉफी टॉवेलमध्ये का गुंडाळली याचा किस्सा सर्वांसोबत शेअर केलाय
ए,आर.रेहमान हे भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय संगीतकार आणि गायक. ए,आर.रेहमान यांनी आजवर विविध सिनेमांच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. रेहमान यांनी 'स्लमडॉग मिलेनियर' गाण्याला दिलेल्या संगीतामुळे त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. रेहमान यांनी ऑस्कर मिळवल्यावर त्यांच्या आईने मात्र त्यांना मिळालेल्या ऑस्कर ट्रॉफी टॉवेलात गुंडाळल्या. काय होतं यामागचं कारण?
लेकाला मिळालेल्या ऑस्कर ट्रॉफी आईने टॉवेलात गुंडाळल्या?
एका मुलाखतीत ए.आर.रेहमान यांनी खुलासा केला की, "मला मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार मी दुबईत ठेवले आहेत. एकदा आई घरी आली आणि तिने मला मिळालेल्या ऑस्कर ट्रॉफींना टॉवेलमध्ये गुंडाळले. तिला वाटलं की मिळालेला ऑस्कर हा सोन्याची एक मौल्यवान वस्तू आहे. त्यामुळे ती सुरक्षित ठिकाणी ठेवायला निघाली. पुढे मी काही पुरस्कार माझ्याकडे ठेवले. आणि काही पुरस्कार दुबईतील फिरदोस स्टूडियोला दिले."
Thalaivan vera level#ARRahman | @arrahmanpic.twitter.com/WFQwkwFaKg
— 🐅Tiger Siva (@ssrkarr) May 21, 2024
रहमान पुढे म्हणाले, "मला वाटते मी आता पुरस्कारांचा ठराविक टप्पा पार केलाय. मी काहीतरी विकसीत केलंय. आता मी नवनवीन गोष्टी शोधत आहे. मी जी लोकांची विश्वासार्ह्यता कमावली आहे ती मी माझ्या कामात वापरु शकतो का, हे मला बघायचं आहे." रेहमान यांनी आजवरच्या कारकीर्दीत दोन ऑस्कर, दोन ग्रॅमी, एक बाफ्टा आणि एक गोल्डन ग्लोब, सहा राष्ट्रीय पुरस्कार आणि 32 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.