सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी पाण्यासारखा खर्च केला पैसा, तीन दिवसांसाठी मोजले तब्बल इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 07:20 PM2023-02-07T19:20:03+5:302023-02-07T19:20:58+5:30

राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडे आकारले जाते.

Money spent like water for Siddharth-Kiara's wedding, counted for three days, so many crores | सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी पाण्यासारखा खर्च केला पैसा, तीन दिवसांसाठी मोजले तब्बल इतके कोटी

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी पाण्यासारखा खर्च केला पैसा, तीन दिवसांसाठी मोजले तब्बल इतके कोटी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने लग्नासाठी राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली आहे. या लग्नासाठी साधारण किती खर्च आला याची माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांचे राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी उपस्थित आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या हळदी आणि संगीत सेरेमनीचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. लग्नासाठी पॅलेसला आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या शाही विवाह सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.


राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर असून हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारे भाडेही खूप आहे. जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडे आकारण्यात येते. या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडे आकारले जाते.
त्यानुसार सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे ठिकाण असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे लग्न आज पार पडले असून संध्याकाळी त्यांनी  सूर्यगढ पॅलेसमध्येच रिसेप्शन ठेवले आहे.

Web Title: Money spent like water for Siddharth-Kiara's wedding, counted for three days, so many crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.