मॉन्सून सफारी

By Admin | Published: July 9, 2015 01:41 AM2015-07-09T01:41:11+5:302015-07-09T04:45:46+5:30

पावसाळा म्हटला, की ‘फुल्ल टू धमाल’. वर्षाॠतूच्या हंगामात आऊटडोअर शूटिंगचे ‘पॅक अप’ होत असल्याने कलाकारांचा मूड ‘हॉलिडे’साठी आपोआपच सेट झालेला असतो.

Monsoon Safari | मॉन्सून सफारी

मॉन्सून सफारी

googlenewsNext

पावसाळा म्हटला, की ‘फुल्ल टू धमाल’. वर्षाॠतूच्या हंगामात आऊटडोअर शूटिंगचे ‘पॅक अप’ होत असल्याने कलाकारांचा मूड ‘हॉलिडे’साठी आपोआपच सेट झालेला असतो. मग हमखास पावले वळतात आवडत्या ‘डेस्टिनेशन’कडे. पावसाळ्यात कुठल्या धबधब्याखाली जायचे... कुठे विहार करायचा...असे तुमच्या आमच्यासारखेच सेलीब्रिटीजचेही ‘प्लॅन’ ठरलेले असतात... कोणाला कुठे जायला आवडते ते सांगतायत, सर्वांचे लाडके कलाकार!

अंकुश चौधरी
मी मूळचा मुंबईचा असलो तरी पावसाळ्यातील माझं आवडतं डेस्टिनेशन मात्र पुणे आहे. शूटिंग बंद असेल तेव्हा पुण्यात पर्वती, चतु:शृंगी, सिंहगडावर मित्रांसोबत मनसोक्त भिजायला मला खूप आवडतं.

संकर्षण कऱ्हाडे
नगरला इव्हेंटनिमित्त जावं लागतं. तेव्हा मी माळशेज घाटातून जाणे पसंत करतो. पावसाळ्यामध्ये या घाटातून जाण्याची मजा काही औरच असते. घाटात वळणावर मंदिर असून, तेथे स्वीटकॉर्न, भजी खाण्यात वेगळा आनंद आहे़

वीणा जामकर
बालपण कोकणात गेल्यामुळे अजूनही पावसाळा म्हणून कोकण हेच डेस्टिनेशन आवडते. पावसात कागदी होड्या तयार करून घराशेजारील वाहत्या नाल्यात त्या सोडण्यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही, असे मला वाटते. पावसाळ्यात चिंब भिजताना त्या खवळत्या समुद्राच्या लाटांचा आनंद घेणे यासारखा भन्नाट अनुभव असूच शकत नाही.

मानसी नाईक
मी पक्की पुणेकर असल्याने मला पुण्यातल्या पावसातच भिजायला आवडतं. पाऊस सुरू झाला, की आलं टाकून चहा बनविते आणि माझ्या रूममध्ये खिडकीत बसून गरम चहाचा आस्वाद घेत पावसाचा आनंद लुटते.

कादंबरी कदम
म्हणतात ना, खरा पावसाचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन एन्जॉय करावा, म्हणजे पावसाचा खरा आनंद लुटल्यासारखा आहे, त्यामुळे पावसाळ्यात माझं आवडणारं डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा.

Web Title: Monsoon Safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.