या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 07:00 PM2019-05-12T19:00:00+5:302019-05-12T19:00:02+5:30

आजवर अनेक सेलिब्रेटींनी अनेक वर्षांच्या संसारानंतर आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटासाठी या सेलिब्रेटींना तगडी रक्कम मोजावी लागली आहे.

Most Expensive Divorces Of Bollywood Celebs That Will Blow Your Mind | या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे

या सेलिब्रेटींना घटस्फोट पडला महागात... मोजावे लागले इतके पैसे

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात फरहान आणि अधुना दहा हजार स्क्वेअर फूटच्या घरात राहात होते. हे घर देखील फरहानने अधुनाला देऊन टाकले. तसेच त्यांच्या दोन मुलींच्या भविष्यासाठी फरहानने काही पैसे इन्व्हेस्ट केले आहेत.

पेज 3 चित्रपटातील कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याने खऱ्या अर्थाने बॉलिवूड जगातील नातेसंबंधावर प्रकाश टाकला आहे. बॉलिवूडची ही दुनिया खूपच झगमगती आहे. मात्र या झगमगत्या दुनिये मागे अनेक कटू सत्यदेखील आहेत. या इंडस्ट्रीत अफेअर, ब्रेकअप होणे यात काही नवीन नाही. आजवर अनेक सेलिब्रेटींनी अनेक वर्षांच्या संसारानंतर आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटासाठी या सेलिब्रेटींना तगडी रक्कम मोजावी लागली आहे. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रेटी...

करिश्मा कपूर आणि संजय कपूर
करिश्मा कपूरचा अभिषेक बच्चन सोबत साखरपुडा झाला होता. ते लवकरच लग्न करतील असे वाटत असताना हा साखरपुडा अचानक तुटला. त्यानंतर काही वर्षांनी तिने संजय कपूर या दिल्लीतील व्यवसायिकासोबत लग्न केले. संजयचे हे दुसरे लग्न होते. सुरुवातीला संजय आणि करिश्मामध्ये सगळे काही सुरळीत सुरू होते. त्यांना दोन मुले देखील आहेत. पण संजयच्या विचित्र स्वभावामुळे त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. घटस्फोट घेताना संजयच्या वडिलांचे खार येथील घर करिश्माच्या नावावर करण्यात आले. तसेच त्याने मुलांसाठी 14 करोडचे बाँड घेतले. त्याचे दर महिन्याला 10 लाख इतके व्याज मिळते. एवढेच नव्हे तर मुलांच्या सगळ्या खर्चासाठी देखील संजयच पैसे देतो.

 

फरहान अख्तर आणि अधुना भबानी
फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. पण 16 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. मीडियातील रिपोर्टनुसार फरहानने अधुनाला दर महिन्याला पैसे न देता एकदाच मोठी रक्कम दिली. तसेच मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात फरहान आणि अधुना दहा हजार स्क्वेअर फूटच्या घरात राहात होते. हे घर देखील फरहानने अधुनाला देऊन टाकले. तसेच त्यांच्या दोन मुलींच्या भविष्यासाठी फरहानने काही पैसे इन्व्हेस्ट केले आहेत.

हृतिक रोशन आणि सुझान खान
हृतिक रोशन आणि सुझान खान हे लहानपणापासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. त्यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. बॉलिवूडमधील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जात असे. पण काईट या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याआधी हृतिक आणि सुझानमध्ये दुरावा आला असल्याच्या बातम्या मीडियात आल्या. त्या दोघांनी या केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. पण 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सुझानने घटस्फोट घेताना हृतिककडे 400 कोटी रूपये मागितले असल्याचे म्हटले जात होते. पण असे काहीही नसल्याचे हृतिकने ट्वीटद्वारे सांगितले होते. पण घटस्फोटाच्या वेळी त्याने सुझानला 380 करोड दिले असे म्हटले जाते.

सैफ अली खान आणि अमृता सिंग
सैफ अली खानने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंगसोबत प्रेमविवाह केला. त्या दोघांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. त्या दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना सैफच्या आयुष्यात रोजा ही इटालियन मॉडेल आली. त्यांच्या अफेअरच्या बातम्या मीडियात येत असतानाच अमृता आणि सैफ अली खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सैफने अमृताला घटस्फोट देताना किती पैसे दिले याविषयी सांगितले नसले तरी त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, मला अमृताला पाच करोड द्यायचे आहेत आणि त्यापैकी 2.5 करोड मी तिला दिलेले आहेत. तसेच माझा मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत मला तिला 1 लाख रुपये दर महिन्याला द्यायचे आहेत. मी शाहरुख खान नाहीये की माझ्याकडे खूप पैसे असतील. मी तिला शिल्लक असलेली रक्कम लवकरच देईन असे मी तिला वचन दिले आहे. 

संजय दत्त आणि रिया पिल्लई
संजय दत्ताची पत्नी रिचा शर्माच्या निधनानंतर रिया त्याच्या आयुष्यात आली. लग्नानंतर काहीच वर्षांत टेनिस स्टार लिएंडर पेससोबत रियाचे अफेअर सुरू झाले आणि त्या दोघांनी काहीच महिन्यांत घटस्फोट घेतला. संजयने घटस्फोट देताना त्याचे मुंबईतील एक प्रशस्त घर आणि महागडी गाडी रियाला पोटगी म्हणून दिली.

लिएंडर पेस आणि रिया पिल्लई
संजय दत्तसोबत लग्न झालेले असताना रिया पिल्लईचे अफेअर लिएंडर पेससोबत सुरू झाले. संजयसोबत घटस्फोट झाल्यावर तिने लिएंडरसोबत लग्न केले. पण काहीच दिवसांत त्यांच्यात खटके उडायला लागले आणि त्या दोघांनी घटस्फोट घेतला. रियाने घटस्फोटाच्यावेळी चार लाख रुपयांची मागणी केली होती.

आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना
आदित्य चोप्राच्या आयुष्यात राणी मुखर्जी आल्यावर त्याने त्याची पत्नी पायलला घटस्फोट देण्याचे ठरवले असे म्हटले जाते. पण त्याच्या घटस्फोटामागे खरे कारण काय होते याबद्दल त्या दोघांनी न बोलणेच पसंत केले. पायलला आदित्यने मोठ्या रक्कमेची पोटगी दिली असे म्हटले जाते. पण ही रक्कम काय होती याबाबत त्यांनी मौन राखणेच पसंत केले होते. 

प्रभू देवा आणि रामलाथ
रामलाथ आणि प्रभूदेवा यांनी अनेक वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. प्रभुदेवाने घटस्फोटाच्यावेळी रामलाथला पोटगी म्हणून 10 लाख रुपये, दोन महागड्या गाड्या आणि 20 करोडची प्रॉपर्टी दिली.

आमिर खान आणि रिना दत्ता
आमिर खान आणि रिना दत्ताला दोन मुले असून त्यांनी लग्नाच्या अनेक वर्षांनी घटस्फोट घेतला. आमिरने रिनाला पोटगी म्हणून मोठी रक्कम दिली असे म्हटले जाते. पण ही रक्कम किती होती याबाबत त्याने कधीच सांगितले नाही.

Web Title: Most Expensive Divorces Of Bollywood Celebs That Will Blow Your Mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.