मौनी रॉयचा चढला पारा? हिना खानपेक्षाही कमी फी म्हणजे काय??

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 10:23 AM2018-09-06T10:23:51+5:302018-09-06T10:25:08+5:30

मौनी रॉय सध्या जोरात आहे़ ‘गोल्ड’द्वारे तिचा दणकेबाज बॉलिवूड डेब्यू झाला. पहिलाच डेब्यू चित्रपट सुपरडुपर हिट झाल्यानंतर मौनीचे भाव वाढलेत. 

mouni roy turned down a project because of less payment offered for a web series in comparison to hina khan | मौनी रॉयचा चढला पारा? हिना खानपेक्षाही कमी फी म्हणजे काय??

मौनी रॉयचा चढला पारा? हिना खानपेक्षाही कमी फी म्हणजे काय??

मौनी रॉय सध्या जोरात आहे़ ‘गोल्ड’द्वारे तिचा दणकेबाज बॉलिवूड डेब्यू झाला. पहिलाच डेब्यू चित्रपट सुपरडुपर हिट झाल्यानंतर मौनीचे भाव वाढलेत. इतके की, आता छोट्या पडद्यावर काम न करण्याचा निर्णय तिने म्हणे घेतलाय. खरे तर मौनी इतकीच आणखी एक व्यक्तीही सध्या जोरात आहे. ती म्हणजे अभिनेत्री हिना खान. हिनाला एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की2’मध्ये कमोलिकाची आयकॉनिक भूमिका आॅफर झाली आहे. या शोसाठी हिनाला सर्वाधिक फी दिली जात आहे. या ‘फी’ची गोष्टच मौनीने सध्या मनावर घेतली आहे. गोंधळलात ना? समजा मौनीला हिना खानपेक्षा कमी फी आॅफर झाली तर? नेमके हेच प्रकरण आहे. मौनीबद्दलही हेच झालेय.

 होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अगदी अलीकडे मौनीला एक वेबसीरिज आॅफर झाली. पण याची फी हिना खानला मिळणाऱ्या रकमेपेक्षाही कमी होती. मग काय, मौनीला ही गोष्ट जाम खटकली. ‘गोल्ड’ हिट झाल्यानंतर मौनीने प्रति एपिसोड ३ लाख रूपये फी मागितली होती. ही इतकी मोठी रक्कम वेबसीरिजच्या निर्मात्यांच्या बजेटबाहेर होती. पण मौनी एक पैसाही कमी करायला तयार नव्हती. मग काय, तिने हा प्रोजेक्ट सोडणेच योग्य समजले.
आता यात किती तथ्य आहे, हे मौनीने स्वत: खुलासा केल्यानंतरचं कळेल. पण यात जराही तथ्य असेल तर बॉलिवूडच्या धर्तीवर टीव्ही जगतातही प्राईज वॉर सुरू झालेय, असे समजायला हरकत नाही.
मौनी सध्या बिझी आहे. ‘गोल्ड’ हातावेगळा केल्यावर तिच्याकडे जॉन अब्राहमचा ‘रॉ’, रणबीर-आलिया स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ शिवाय राजकुमारचा ‘मेड इन चायना’ असे अनेक चित्रपट आहेत.

Web Title: mouni roy turned down a project because of less payment offered for a web series in comparison to hina khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.