Movie Review : बादशहाचा 'रईस' निराशादायी

By Admin | Published: January 25, 2017 08:09 AM2017-01-25T08:09:35+5:302017-01-25T08:13:43+5:30

कसा आहे बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचा बहुचर्चित 'रईस' चित्रपट. जाणून घ्या या रिव्ह्यूमधून..!

Movie Review: The 'Rais' of the Empire is disappointing | Movie Review : बादशहाचा 'रईस' निराशादायी

Movie Review : बादशहाचा 'रईस' निराशादायी

googlenewsNext
>- जान्हवी सामंत
 
स्टार : 2/5
 
स्टारकास्ट : शाहरूख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, माहिरा खान, अतुल कुलकर्णी, रोहित रॉय
 
दिग्दर्शक : राहुल ढोलकिया
 
 
मुंबई, दि. २५ - बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचा बहुचर्चित 'रईस' आज प्रदर्शित होत असून हृतिक रोशनच्या 'काबिल'शी त्याची बॉक्सऑफीसवर टफफाईट होणार आहे. दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे असले तरी दोन स्टार्सचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना..! शाहरूखसोबतच या चित्रपटात गुणवान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अतुल कुलकर्णी, रोहित रॉय आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांचीही प्रमुख भूमिका आहे. आता या वीकेंडला 'रईस' पहायचा की 'काबिल' असा प्रश्न पडला असेल तर मग हा रिव्ह्यू नक्की वाचा.
तर ही कहाणी आहे अवैधरित्या मद्यतस्करी करणा-या 'रईस'ची (शाहरूख खानची). त्याच्या मनात सतत उद्योगाबाबत विचार सुरू असतात. गुन्हेगारीचे वास्तव्य असलेल्या  गुजरातमधील फतेहपुरा येथील एका गरीब भंगारवालीच्या घरी रईसचा जन्म होतो. लहानपणापासूनच त्याची अम्मी त्याला सांगत असते ‘कोई धंदा छोटा नही होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता’.  हेच वाक्य प्रेरणास्थानी ठेऊन रईस जयराजसोबत दारूधंद्याचे अवैध साम्राज्य उभे करतो. आपल्या हुशारीने तो जयराजसोबत व्यवसाय वाढवतो. ज्यावेळी रईस स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवितो, त्यावेळी त्याचे आणि जयराजचे शत्रुत्व निर्माण होते. या व्यवसायात सुरुवातीच्या काही अपयशानंतर रईसचा व्यवसाय वाढीस लागतो. त्याचवेळी  रईसची एका प्रामाणिक पोलीस अधिकारी मजुमदार (नवाजुद्दीन सिद्दीकी) याच्याशी त्याची गाठ पडते. रईसला अटक करण्याचे प्रयत्न अयशस्वी होतात. यानंतर मात्र मजुमदारला रईसच्या अटकेसाठी आणखी त्वेष चढतो.
रईसच्या अटकेचा कट आणखी संघर्षमय आणि गुंतागुंतीचा होतो. व्यवसायाच्या नावाखाली रईस त्याची ताकद अजून वाढवितो. मध्यंतरापर्यंत रईसचे पात्र हे त्याच्या हुशारीबाबत, धंद्यातील अडचणी, त्याचा दयाळूपणा आणि लोकांबाबतचे त्याचे प्रेम याची महती सांगते. तथापि, मध्यंतरानंतर हे पात्र गुंतागुंतीचे आणि गतीमान होते. कथा वेगाने सांगण्याच्या कचाट्यात सापडते. थोडक्यात रईस हा टिपीकल शाहरुख खानच्या पठणीतल्या चित्रपटासारखा नाही, असे म्हणता येईल. यामध्ये त्याच्या नेहमीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटासारखा मसाला नाही. हा केवळ  सत्यासारखा असंबद्ध अथवा वास्तव नसून अग्निपथसारखा स्टायलिश आणि बिनधास्तही आहे.
मात्र रईसला हिरो करण्याच्या नादात आणि नि:स्वार्थीपणाच्या प्रयत्नात हा चित्रपट दर्शकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत नाही. रईसच्या माध्यमातून दिग्दर्शक राहुल ढोलकिया हे ८० आणि ९० च्या दशकात निर्माण झालेले दयावान, काला पत्थर आणि अग्निपथसारख्या चित्रपटांची आठवण करून देतात. जुन्या पाश्चात्य पद्धतीचे पार्श्वसंगीतही आहे. शाहरुख खान हा नेहमी शहरीपद्धतीचा शिकलेला रोमँटिक हिरो म्हणून आपल्याला दिसतो. एसआरकेने आपली इमेज बदलताना तो हिंसाचारी, आक्रमक गँगस्टर म्हणून संपूर्ण चित्रपटात दिसतो. मोहम्मद झिशान अय्युब याने अत्यंत शांत संयमी भूमिका केली आहे. नवाजने त्याच्या शत्रूची भूमिका सहजगत्या साकारली आहे. या संपूर्ण चित्रपटात एकमेव चुकीच्या भूमिकेत दिसणारी व्यक्ती म्हणजे माहिरा खान. ती असून नसल्यासारखीच आहे.  शाहरूखच्या चित्रपटांच्या यशात संगीत मोलाचा वाटा बजावतो. मात्र या चित्रपटाच्या संगीताने साफ निराशा केली आहे. 
 

Web Title: Movie Review: The 'Rais' of the Empire is disappointing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.