धाग्यांमध्ये विणलेली माय-लेकीची भावुक कहाणी! मृणाल कुलकर्णींचा हिंदी सिनेमा 'पैठणी', ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:36 PM2024-11-07T13:36:41+5:302024-11-07T13:42:24+5:30

मृणाल कुलकर्णींच्या नव्या हिंदी सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज झालाय (paithani)

mrinal kulkarni new hindi movie paithani trailer out now | धाग्यांमध्ये विणलेली माय-लेकीची भावुक कहाणी! मृणाल कुलकर्णींचा हिंदी सिनेमा 'पैठणी', ट्रेलर रिलीज

धाग्यांमध्ये विणलेली माय-लेकीची भावुक कहाणी! मृणाल कुलकर्णींचा हिंदी सिनेमा 'पैठणी', ट्रेलर रिलीज

मृणाल कुलकर्णी या लोकप्रिय अभिनेत्री. मृणाल यांनी केवळ मराठीच नव्हे तर 'सोनपरी', 'द काश्मिर फाईल्स' अशा प्रोजेक्टमधून हिंदी इंडस्ट्री अन् बॉलिवूडमध्येही त्यांच्या अभिनयाचा डंका मिरवला आहे. मृणाल कुलकर्णी यांचा नवीन हिंदी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.  या सिनेमाचं नाव आहे 'पैठणी'. मृणाल कुलकर्णींचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. नुकताच सोशल मीडियावर 'पैठणी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

मृणाल कुलकर्णींच्या 'पैठणी'चा ट्रेलर

नुकताच सोशल मीडियावर 'पैठणी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमात दिसतं की मृणाल कुलकर्णी हातमागावर पैठणी साड्या विणताना दिसतात. साडी बनवणं ही एक कला आहे असं त्या मानतात. मृणाल कुलकर्णींनी विणलेल्या पैठणी साड्यांची पंचक्रोशीत खूप चर्चा असते. पण अशातच मृणाल यांना कमी दिसायला लागतं. त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी समस्या निर्माण होते. तेव्हा त्यांची मुलगी आईला कशी मदत करते? याची भावुक कहाणी 'पैठणी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.


कुठे आणि कधी पाहायला मिळणार 'पैठणी'?

झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्वर 'पैठणी' सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा १५ नोव्हेंबरला झी ५ मध्ये घरबसल्या बघायला मिळणार आहे. सिनेमात मृणाल यांनी गोदाची भूमिका साकारलेली दिसतेय. तर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा सिंग झळकताना दिसणार आहे. मृणाल कुलकर्णी यांना 'द काश्मिर फाईल्स'नंतर हा हिंदी सिनेमा पाहायला मिळणार आहे. सर्वांना ही आगळीवेगळी 'पैठणी' अनुभवण्याची उत्सुकता आहे.

Web Title: mrinal kulkarni new hindi movie paithani trailer out now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.