Mrunal Thakur : Video - "ती फक्त डोळ्यांनी बोलते"; लग्नाआधीच मृणाल ठाकूर झालीय ८ वर्षांच्या मुलीची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:50 PM2024-08-08T12:50:05+5:302024-08-08T12:59:02+5:30

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरही अद्याप लग्नबंधनात अडकलेली नाही. मात्र ती एका मुलीची आई झाली आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण खरं असून ती ८ वर्षांच्या मुलीची आई आहे.

Mrunal Thakur said kiara khanna is my first daughter whenever my child will born will be second | Mrunal Thakur : Video - "ती फक्त डोळ्यांनी बोलते"; लग्नाआधीच मृणाल ठाकूर झालीय ८ वर्षांच्या मुलीची आई

Mrunal Thakur : Video - "ती फक्त डोळ्यांनी बोलते"; लग्नाआधीच मृणाल ठाकूर झालीय ८ वर्षांच्या मुलीची आई

इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधीच आई होण्याचा निर्णय घेतला आहे. ३२ वर्षीय अभिनेत्री मृणाल ठाकूरही अद्याप लग्नबंधनात अडकलेली नाही. मात्र ती एका मुलीची आई झाली आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण खरं असून ती ८ वर्षांच्या मुलीची आई आहे. तिने स्वत:च हे सांगितलं आहे. तिला जेव्हा बाळ होईल तेव्हा ते तिचं दुसरं मुल असेल असं मृणालने म्हटलं आहे. 

मृणाल ठाकूरने एका मुलाखतीदरम्यान तिच्या या आठ वर्षांच्या लेकीबाबत सांगितलं आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "ते माझं पहिलं मूल आहे, आता जेव्हाही बाळ होईल तेव्हा ते माझं दुसरं मूल असेल. कारण ती माझी पहिली मुलगी आहे. एक वेगळा बॉन्ड निर्माण झाला आहे. मला Mmmm असं म्हणते. ती खूप छान आहे आणि ती फक्त डोळ्यांनीच बोलते. तिच्याकडून शिकणं खूप सुंदर आहे, ती मला शिकवते हे तिला माहीतही नाही"


अभिनेत्री ज्या मुलीला आपलं पहिलं मुल म्हणत आहे ती आठ वर्षांची आहे. कदाचित तुम्ही विचार करत असाल की मृणालने तिला दत्तक घेतलं असेल. पण असं काही नाही. मृणालने मुलीला जन्म दिला नाही किंवा दत्तक देखील घेतलेलं नाही. ही मुलगी म्हणजे चाइल्ड एक्ट्रेस कियारा खन्ना आहे. मृणालने कियारासोबत साऊथ स्टार नानीच्या 'हाय नन्ना' चित्रपटात काम केलं होतं. 

चित्रपटात मृणाल 'यशना' तर कियाराने 'माही'ची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ किआराने स्वत: देखील शेअर केला. तसेच व्हिडिओ रेड इमोजीही शेअर केला आहे. एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. "तू मला भेटलीस त्यासाठी मी खूप आभारी आहे M... माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि मला तुझी खूप आठवण येतं. मला लवकर भेट" असं म्हटलं आहे. 
 

Web Title: Mrunal Thakur said kiara khanna is my first daughter whenever my child will born will be second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.