प्रेमात मृणाल ठाकूरला मिळालाय अनेकदा दगा, तिनेच सांगितलं ब्रेकअपचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 11:14 AM2022-02-12T11:14:12+5:302022-02-12T11:16:16+5:30
Mrunal Thakur : मृणालने एका मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबाबत काही खुलासे केले आहेत. यात तिने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डबाबतही सांगितलं आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मृणाल सुंदर तर आहेच सोबतच तिचं कामंही कौतुकास्पद असतं. मृणाल आता शाहिद कपूरसोबत 'जर्सी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची फॅन्सना आतुरता लागलेली आहे. पण कोविडमुळे हा सिनेमा अजून रिलीज केलेला नाही. मृणालने एका मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबाबत काही खुलासे केले आहेत. यात तिने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डबाबतही सांगितलं आहे.
मृणालने एका मुलाखतीत सांगितलं की, 'प्रेमात तिला अनेकदा दगा मिळाला आहे. ७ महिन्यांआधीच तिचं ब्रेकअप झालं आहे आणि तिच्या बॉयफ्रेन्डने तिला सोडलं कारण तो मृणालच्या कामावरून आणि तिच्या स्वभावाबाबत सहज नव्हता.
यूट्यूबर रणवीप अहलाबादियासोबत बोलताना मृणाल म्हणाली की, योग्य लोकांसोबत राहण्यासोबतच तुम्हाला चुकीच्या लोकांसोबतही राहवं लागतं. तुम्हाला नात्यांची परीक्षा घ्यावी लागते. यातून तुम्हाला अनुभव येतो की, एका रिलेशनशिपमध्ये तुमच्या दृष्टीने काय योग्य आहे आणि काय चुकीचं. मला अशा रिलेशनशिपमध्ये रहायचं नाहीये ज्यात इन्वॉल्व झाल्यानंतर मला समजावं की, या रिलेशनशिपमध्ये अंडरस्टॅंडिंग आणि सहजता नाही. (हे पण वाचा : Mrunal Thakur च्या मनात येत होते आत्महत्येचे विचार, लोकल ट्रेनमधून मारणार होती होती; कारण...)
आधीच्या रिलेशनशिपबाबत मृणाल म्हणाली की, तो निघून गेला. त्याला वाटायचं की, मी नेहमीच घाईत असते. तो यासोबत डिल करू शकत नव्हता. तो म्हणाला की, तू एक अभिनेत्री आहे. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. पण मी समजून गेले की, तो फार जुन्या मानसिकतेच्या परिवारातून होता. मी त्याला दोष देणार नाही. तो त्याच्या कुटुंबियांमुळे असा होता. मला आनंद आहे की, हे नातं लगेच संपलं. कारण हे नातं पुढे गेलं असतं तर आमच्यासाठी आणि नंतर मुलांसाठी कठीण झालं असतं.
मृणाल ठाकूरला अजून इंडस्ट्रीत १० वर्षेही पूर्ण झाले नाहीत. तरी तिने बऱ्याच मोठ्या सिनेमात आणि मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. ती साऊथ इंडस्ट्रीतही दिसली आहे. तिने सुपर ३०, बाटला हाऊस, धमाका, तूफान, घोस्ट स्टोरीज सारख्या सिनेमात काम केलं आहे. तिचे काही मोठे सिनेमे येणार आहेत. ज्यात आंख मिचौली, लेफ्टिनंट राम, पिप्पा आणि गुमराह या सिनेमांचा समावेश आहे.