'क्राइम पेट्रोल' फेम नितीन चौहानचं निधन, वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:24 AM2024-11-08T10:24:31+5:302024-11-08T10:24:51+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितीन चौहानचं निधन झालं आहे.

MTV Splitsvilla 5 and Crime Patrol fame TV Actor Nitin Chauhaan Dies At 35 | 'क्राइम पेट्रोल' फेम नितीन चौहानचं निधन, वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

'क्राइम पेट्रोल' फेम नितीन चौहानचं निधन, वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!

Nitin Chauhaan Passed Away: सिनेसृष्टीमधून एक खूप दु:खद बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता नितीन चौहानचं (Nitin Chauhan) निधन झालं आहे. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नितीन चौहान याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.   पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

 नितीन चौहानचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. त्याच्या एका सहकलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. अभिनेत्री विभूती ठाकूर हिने नितीन चौहानच्या निधनाची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली.  विभूती ठाकूरच्या पोस्टवरून नितीन चौहानने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी त्यांच्या मृत्यूच्या कारणाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

विभूतीने नितीनसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला. विभूतीने कॅप्शनमध्ये लिहलं, "Rest In Peace माय डिअर, मोठा धक्का बसलाय आणि वाईट वाटतंय. सर्व अडचणींचा सामना करण्याची ताकद तुला मिळाली असती तर बरं झालं असतं. शरीराप्रमाणे मानसिकदृष्ट्याही तू मजबूत असतास तर चांगलं झालं असतं, अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत. 

नितीन हा मूळचा उत्तर प्रदेशमधील अलिगडचा होता. त्याने   'जिंदगी डॉट कॉम', 'क्राइम पेट्रोल' आणि 'फ्रेंड्स', 'स्प्लिट्सविला ५'  यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे. तर  'दादागिरी २' या रिॲलिटी शोचा विजेता आहे. नितीनच्या निधनाने संपूर्ण टिव्ही विश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

 

Web Title: MTV Splitsvilla 5 and Crime Patrol fame TV Actor Nitin Chauhaan Dies At 35

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.