Munjya : 'मुंज्या' सिनेमा गाजवतोय बॉक्स ऑफिस; ७ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 03:20 PM2024-06-14T15:20:18+5:302024-06-14T15:20:53+5:30

७ जूनला प्रदर्शित झालेला 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर भारी पडत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

mujnya bollywood horror movie box office collection day 7 details | Munjya : 'मुंज्या' सिनेमा गाजवतोय बॉक्स ऑफिस; ७ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

Munjya : 'मुंज्या' सिनेमा गाजवतोय बॉक्स ऑफिस; ७ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'मुंज्या' हा हॉरर कॉमेडी हिंदी सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. अखेर शुक्रवारी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. हटके स्टोरी आणि उत्तम क्लायमॅक्स असलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ७ जूनला प्रदर्शित झालेला 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर भारी पडत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने 'मुंज्या' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आदित्यचा हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या' चांगली कामगिरी करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दिवशी या सिनेमाने जवळपास ४ कोटींचा गल्ला जमवला होता. दोनच दिवसांत ११.२५ कोटींचा बिझनेस या सिनेमाने केला. आतादेखील या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. 

'मुंज्या' सिनेमाचं सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने सात दिवसांत ३६.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. आता येणाऱ्या विकेंडला 'मुंज्या' किती कमावतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

या सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे मराठी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून 'मुंज्या' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

Web Title: mujnya bollywood horror movie box office collection day 7 details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.