"न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली..", ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 05:23 PM2023-01-17T17:23:02+5:302023-01-17T17:32:30+5:30

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दीर्घकाळ ही मालिका टीआरपी चार्टवर अव्वल राहिली.

Mulgi Zali Ho fame actor Yogesh sohoni share a emotional post on social media | "न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली..", ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

"न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली..", ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

स्टार प्रवाहवर  ( Star Pravah) ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेचा संवेदनशील विषय प्रेक्षकांना मनापासून भावला. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दीर्घकाळ ही मालिका टीआरपी चार्टवर अव्वल राहिली. त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.  या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर यातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची पोस्ट चर्चेत आली आहे.

मुलगी झाली हो मालिकेत शौनकने म्हणजेच अभिनेता योगेश सोहोनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली  आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यात त्याने मालिकेच्या सेटवरील अनेक फोटो शेअर केले आहेत.

 शौनकची पोस्ट 
आज "मुलगी झाली हो" या मालिकेचा शेवटच्या भागा प्रदर्शित झाला, ७०० हुन अधिक भागांचा हा अविस्मरणीय प्रवास थांबला. थांबला म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल, कारण जे कुठेतरी थांबलय ते कुठेतरी नव्याने सुरू होणार आहे. आज हे लिहिताना शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी, घटना, किस्से, प्रसंग, डोळयांसमोर आले. हा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणी आल्या, अप्रिय घटना घडल्या, न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली, त्यांचे स्वभाव कळले त्याचबरोबर असंख्य चांगली, प्रेमळ माणसे (कलाकार) भेटले, आणि ते आयुष्याचा एक भाग होऊन गेले. शौनक ही व्यक्तिरेखा साकारताना मला या घडलेल्या सगळ्या प्रसंगाचा, भेटलेल्या माणसांचा, त्यांच्या आलेल्या अनुभवाचा खूप फायदा झाला.

Instagram इतकं ऍडव्हान्स असलं तरी शब्द मर्यादा आणि फोटो अपलोड करायला देखील मर्यादा आहेत हे दुर्दैव आहे, हे मला ३-४ तास मेहेनत करून जो Write Up लिहिला आणि तो अपलोड करायला गेलो तेव्हा कळलं......असो मार्क झुकरबर्ग जेव्हा हा प्रोब्लेम सोडवेल तेव्हा सोडवेल, पण या मार्यादेमुळेच मला सगळ्याची नावं इच्छा असूनही लिहिता येत नाहीयेत याच वाईट वाटतय.

पण मीही खूप चिवट आहे, सगळी नाव जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांचे आभार मानत नाही तो पर्यंत मला चैन पडणार नाही. तर माझ्या फेसबुक वरील पोस्ट मध्ये त्या सगळ्यांबद्दल लिहून आभार मानले आहेत ते जरूर वाचा, फेसबुक ची लिंक Bio मध्ये देत आहे. ते वाचून मायबाप रसिक प्रेक्षकांना कळेल की किती माणसे एखाद्या प्रोजेक्टशी निगडित असतात आणि त्याच योगदान किती महत्त्वाच असतं.लवकरच एका वेगळ्या मालिकेत, वेगळ्या भूमिकेत भेटू तोपर्यंत पुनरागमनायच……

Web Title: Mulgi Zali Ho fame actor Yogesh sohoni share a emotional post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.