"तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा"; हंसल मेहतांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:48 PM2021-10-25T17:48:29+5:302021-10-25T17:49:02+5:30

Hansal mehta: अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे.

mumbai cruise drug case bollywood director hansal mehta demands that ncb sameer wankhede should resign | "तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा"; हंसल मेहतांची मागणी

"तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा"; हंसल मेहतांची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खानकडे तब्बल २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

mumbai cruise drug case: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता (hansal mehta) त्यांच्या चित्रपटांसोबत वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असतात. हंसल मेहता कलाविश्वाप्रमाणेच समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होत असतात. यात बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ते त्यांचं मत मांडत असतात.  गेल्या काही दिवसांपासून ते ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या प्रकरणावर व्यक्त होत आहेत. यामध्येच आता त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NBC) विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. 

मुंबईतील एका क्रुझवर (mumbai cruise drug case) एनसीबीने छापा टाकत ड्रग्ज पार्टीचा डाव उधळून लावला होता. या पार्टीमध्ये शाहरुख खानचा लेक आर्यन खान सहभागी असल्याचं समोर आलं असून सध्या तो आर्थर रोड तुरुंगात आहे. परंतु,या  प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे. अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी हंसल मेहता यांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया देत वानखेडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

"समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे जोपर्यंत हे आरोप सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत वानखेडे यांनी राजीनामा द्यावा. ज्यांना त्यांनी अटक केली आहे. त्यांनीच आपलं निर्दोषत्व सिद्ध का करावं?", असं ट्विट हंसल मेहता यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण?

ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खानकडे तब्बल २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या २५ कोटींपैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. विशेष म्हणजे साईल यांनी एक चित्रफित प्रसारित केली असून त्यांनी प्रतिज्ञापत्रदेखील सोशल मीडियावर शेअर केलं आहे. यात अनेक धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या प्रकणातील दुसरे पंच के. पी. गोसावी आणि सॅम डिसूझा यांचे दूरध्वनीवरील संभाषण मी ऐकले होते. यात २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत व्यवहार फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा प्रभाकर यांनी केला आहे. 


 

Web Title: mumbai cruise drug case bollywood director hansal mehta demands that ncb sameer wankhede should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.