मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 03:24 PM2024-09-11T15:24:59+5:302024-09-11T15:36:09+5:30

Malaika Arora Father Death : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली

Mumbai Police gave important information about the death of actress Malaika Arora's father | मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Anil Arora Death : बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी नऊच्या सुमारास वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीवरून उडी मारून त्यांनी जीवन संपवलं आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक तपासात ही आत्महत्या वाटत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल यांनी बुधवारी मुंबईतील वांद्रे येथे एका इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, अरबाज खान आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असून, अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येमागील संभाव्य कारणे अद्याप अधिकाऱ्यांना समजू शकलेली नसून तपास सुरू आहे. मात्र अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली याचे कारण तपासत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

"इमारतीच्या आत ६२ वर्षीय अनिल अरोरा यांचा मृतदेह सापडला आहे. ते इमारतीमध्ये सहाव्या माळ्यावर राहत होते. आमचे पथक या ठिकाणी पोहोचलं असून पुढील तपास करत आहोत. सध्या आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. फॉरेन्सिक पथकाकडून देखील तपास सुरु आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या वाटत आहे. त्यांनी असे का केले याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत," अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली.

दरम्यान, मलायका अरोरा पुण्यात होती. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच ती मुंबईसाठी रवाना झाली आणि घटनास्थळी पोहोचली आहे. मलायका अरोराचा मुलगा अरहान खान, अमृता अरोरा आणि तिचा पती शकील लडक, अरबाज खानचे वडील सलीम खान, भाऊ सोहेल खान आणि सीमा सजदेहही घटनास्थळी पोहोचले आहेत. मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही मलायकाची काळजी घेताना दिसला. 

Web Title: Mumbai Police gave important information about the death of actress Malaika Arora's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.