'ऑन ड्युटी 24 तास' असलेल्या पोलिसांसाठी 8 हॉटेल बुक केली; रोहित शेट्टीनं मनं जिंकली!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:25 PM2020-04-21T18:25:42+5:302020-04-21T18:26:34+5:30
मुंबई पोलिसांनी ट्विट करत रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत.
सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या थैमानाने हैराण झाले आहे. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. अशा संकटकाळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मुंबई पोलिसांच्या मदतीला धावून आला आहे.
#RohitShetty has facilitated eight hotels across the city for our on-duty #CovidWarriors to rest, shower & change with arrangements for breakfast & dinner.
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 21, 2020
We thank him for this kind gesture and for helping us in #TakingOnCorona and keeping Mumbai safe.
कोरोना व्हायरसविरोधात लढण्यसाठी मुंबई पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. या ऑन ड्युटी पोलिसांसाठी रोहित शेट्टीने तब्बल आठ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. ज्या हॉटेल्सवर जाऊन ऑन ड्युटी पोलिस थोडा आराम करु शकतात. या हॉटेल्समध्ये पोलिसांच्या नाश्ता आणि जेवणाची सोयसुद्धा रोहितने केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. सध्या रोहित शेट्टीने केलेल्या कामाबाबत त्याचे सर्वस स्तरांतून कौतूक करण्यात येते आहे. याआधी ही रोहितने 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'ला 51 लाखांची मदत केली आहे.
लवकरच रोहित शेट्टीचा सूर्यवंशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका आहे. मार्च महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र लॉकडाऊनमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.