‘हा तर हसतोय, कमाल आहे...’; NCBच्या व्हॅनमध्ये हसताना दिसला आर्यन खान, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:56 PM2021-10-07T13:56:18+5:302021-10-07T13:57:19+5:30
Mumbai Rave Party Drugs Case : आर्यन खानचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या फोटोवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान सध्या तरी एनसीबीच्या (NCB) कस्टडीत आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या क्रूज पार्टीदरम्यान एनसीबीनं टाकलेल्या छाप्यात (Mumbai Rave Party Drugs Case) आर्यन खान याच्यासह आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे. आज आर्यनची कस्टडी संपतेय. त्यामुळे आज पुन्हा एकदा आर्यनला कोर्टात हजर केलं गेलं. यादरम्यान आर्यनचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या फोटोवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हायरल फोटोत आर्यन एनसीबी अधिका-यांसह व्हॅनमध्ये बसलेला दिसतोय. त्याच्या चेह-यावर मास्क नाही आणि तो हसतोय. अशा परिस्थितीही आर्यन खान (Aryan khan laughing) हसू कसा शकतो? असा सवाल हा फोटो पाहून नेटक-यांना पडला आहे.
‘पाहा, आर्यन खान हसतोय. चेह-यावर जराही पश्चाताप नाही. ड्रग्ज घ्यायची आणि काळजी करायची नाही, हेच त्याला शिकवलं गेलं का?’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तो हसतोय, कमाल आहे, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. तो हसतोय कारण त्याच्यापेक्षा कायदा गरिब आहे, हे त्याला ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
आर्यन खानला अटक झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याला व शाहरूखला पाठींबा दिला आहे.
चौकशीदरम्यान आर्यनने अनेक खुलासे केले आहेत. स्वत:चा 4 पानांचा जबाबही लिहिला आहे. माझे वडिल प्रचंड बिझी असतात. इतके की अनेकदा त्यांना भेटण्यासाठी आम्हाला त्यांची वेळ घ्यावी लागते, असेही त्याने चौकशीदरम्यान सांगितलं.
आर्यनवर केवळ एनडीपीएसच्या कलम 27 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला 20 हजार रुपये दंड आणि 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं एनसीबीच्या एका अधिका-याने सांगितलं आहे.
आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्या बुटांमध्ये चरस लपवल्याचं निदर्शनास आलं आहे.