'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट! रेवा होणार मुकादमांच्या घरची सून, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 10:53 AM2024-07-03T10:53:20+5:302024-07-03T10:54:16+5:30

सध्या मालिका रंजक वळणावर असून 'मुरांबा'मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता पुन्हा एकदा रेवा मुकादमांच्या घरात एन्ट्री घेणार आहे.

muramba marathi serial update reva and abhishek to tie knot rama and akshay shocked watch promo | 'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट! रेवा होणार मुकादमांच्या घरची सून, प्रोमो समोर

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट! रेवा होणार मुकादमांच्या घरची सून, प्रोमो समोर

'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील अक्षय आणि रमा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशानी बोरुले अशी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेवर प्रेक्षक प्रेम करतात. या मालिकेतील मुकादम हे कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. सध्या मालिका रंजक वळणावर असून 'मुरांबा'मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

अक्षयच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी, त्याची बायको आणि मुकादमांच्या घरची सून होण्यासाठी कट कारस्थाने करणाऱ्या रेवाला मुकादमांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. मोठ्या मेहनतीने रेवाची कारस्थाने सगळ्यांसमोर आली होती. त्यामुळे तिला मुकादमांनी घराबाहेर काढलं होतं. पण, आता पुन्हा एकदा रेवा मुकादमांच्या घरात एन्ट्री घेणार आहे. अभिषेक रेवाबरोबर दुसरं लग्न करणार आहे. मुकादमांच्या घरची सून म्हणून रेवा गृहप्रवेश करणार आहे. मालिकेतील या मोठा ट्विस्टचा प्रोमो समोर आला आहे. 

या प्रोमोमध्ये रमा आणि अक्षय अर्थाबरोबर खेळताना दिसत आहेत. तेवढ्यात अभिषेक रेवाशी लग्न करून तिला घरी घेऊन येत असल्याचं पाहायला मिळत आहे. रमा अभिषेक आणि रेवाला ओवाळताना दिसत आहे. गृहप्रवेश झाल्यानंतर रमा रेवाला चांगलंच खडसावतानाही दिसत आहे. "तुझ्याकडून मुकादमांचा मानसन्मान आणि मर्यादा नाही राखल्या गेल्या, तर कान पिळायचा अधिकार मला आहे", असं रमा रेवाला म्हणत आहे. 

'मुरांबा' मालिकेतील या नव्या ट्विस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मालिकेचा हा विशेष भाग ५ जुलैला स्टार प्रवाहवर दुपारी १:३० वाजता दाखवला जाणार आहे. आता पुढे मालिका कोणतं वळण घेते, हे पाहावं लागेल. 

Web Title: muramba marathi serial update reva and abhishek to tie knot rama and akshay shocked watch promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.