'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:37 AM2023-11-30T10:37:26+5:302023-11-30T10:38:43+5:30

सिनेमाच्या रिलीजनंतर अनेक दिवसांनी हा फार्म हाऊस पुन्हा चर्चेत आला आहे.

Murder in Randhawa Paradise shown in rocky aur rani ki prem kahani which is a farmhouse in greater noida | 'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या

'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या

करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातून करणने ७ वर्षांनी दिग्दर्शन केले. रणवीर सिंह आणि आलिया भट यांच्या जोडीला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. भव्य सेट ही तर करण जोहरची खासियतच आहे. सिनेमात 'रंधावा पॅराडाईज' हे रणवीर सिंहचा मॅन्शन दाखवण्यात आलं. तो प्रत्यक्षात ग्रेटर नोएडा येथील फार्म हाऊस आहे. सिनेमाच्या रिलीजनंतर अनेक दिवसांनी हा फार्म हाऊस पुन्हा चर्चेत आला आहे. कारण याठिकाणी एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ग्रेटर नोएडा वेस्ट, उत्तर प्रदेश स्थित मलबरी फार्म हाऊसमध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं चित्रीकरण झालं होतं. यामध्ये रॉकी रंधावा (रणवीर सिंह) याच फार्म हाऊसमध्ये आपल्या परिवारासोबत राहतो असं दाखवण्यात आलं आहे. आता या फार्म हाऊसमध्ये हत्या झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री एका लग्न सोहळ्यादरम्यान ५५ वर्षीय अशोक यादव यांची हत्या झाली. त्यांच्या मुलाच्या सासऱ्यानेच त्यांना गोळी मारली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

सेंट्रल नोएडा पोलिस अधिकाऱ्यांनुसार, ग्रेटर नोएडा वेस्टमधील गौर मलबरी फार्म हाऊसमध्ये एक लग्न होतं. गाजियाबादचे राहणारे शेखर यांनी सोमवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास अशोक यांच्यावर गोळी झाडत हत्या केली. अशोक यांचा मुलगा आणि शेखर यांची मुलगी दोघांचा घटस्फोट होत होता. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरु होता. 

Web Title: Murder in Randhawa Paradise shown in rocky aur rani ki prem kahani which is a farmhouse in greater noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.