सलील कुलकर्णीच्या लेकाची यशस्वी कामगिरी; बारावीत मिळाले 89.33 टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 07:45 PM2023-05-25T19:45:00+5:302023-05-25T19:45:01+5:30
Saleel kulkarni: शुभमला फिलोसॉफी या विषयात सर्वात जास्त मार्क्स मिळाले आहेत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (२५ मे) जाहीर करण्यात आला. यामध्येच मराठीतील प्रसिद्ध संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांच्या लेकानेही यंदा बारावीची परिक्षा दिली होती. त्यामुळे त्याचाही निकाल आज आला. विशेष म्हणजे सलील कुलकर्णी यांच्या लेकाने उत्तम गुण मिळवत उत्तीर्ण झाला आहे.
सलील कुलकर्णी यांच्या थोरल्या लेकाचं नाव शुभम कुलकर्णी असं असून त्याने बारावीत 89.33 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाला आहे. शुभमला फिलोसॉफी या विषयात 100 पैकी 96 गुण मिळाले आहेत. मुलाचं हे यश साजरं करण्यासाठी सलीलने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
“वागणार नाही वाईट साईट राखेल तुमचं नाव, माझे आईबाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव,” हे शुभमने गायलेलं गाणं त्याने या पोस्टच्या बँकग्राऊंडला टाकला आहे. शुभमने हे गाणं वयाच्या पाचव्या वर्षी गायलं होतं.
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा 91.25 टक्के लागला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.1 टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी 88.13 टक्के लागला.