महामारीच्या काळातील मार्मिक घटनांचा उहापोह म्हणजे म्युझिक व्हिडिओ 'अधुरी कहानी', संगीतप्रेमींच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:16 PM2021-10-20T20:16:27+5:302021-10-20T20:18:41+5:30

इंडियन आयडॉल सीझन १ चा फायनलिस्ट हरीश मोयलने हे गाणं लिहिलंय. हा व्हिडिओ अभिनेत्री कृषेका पटेलवर चित्रित करण्यात आला आहे.

Music Video 'Adhuri Kahani' shares glimpses of all incidents happened during pandemic | महामारीच्या काळातील मार्मिक घटनांचा उहापोह म्हणजे म्युझिक व्हिडिओ 'अधुरी कहानी', संगीतप्रेमींच्या भेटीला

महामारीच्या काळातील मार्मिक घटनांचा उहापोह म्हणजे म्युझिक व्हिडिओ 'अधुरी कहानी', संगीतप्रेमींच्या भेटीला

googlenewsNext

कोरोना काळात अनेकांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागलंय.अनेकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय तर, काहीचे प्रेमसंबंधही कायमचे तुटले आहेत.  प्रेम करणे जेवढे सोपे आहे, तितकंच ते टिकवून ठेवणं कठीण. ब्रेकअपवर आधारित 'अधुरी कहानी' हा तीन मिनिटांचा म्युझिक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.अनिरुद्ध धूत आणि सुनील जे. जैन यांनी या म्युझिक व्हिडीओची निर्मिती केली आहे. व्हिडिओमध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. जी अपूर्ण राहिलीय. प्रेमभंग झालेल्या जोडप्याचीही कहाणी या व्हिडीओत पाहायला मिळते.

इंडियन आयडॉल सीझन १ चा फायनलिस्ट हरीश मोयलने हे गाणं लिहिलंय. हा व्हिडिओ अभिनेत्री कृषेका पटेलवर चित्रित करण्यात आला आहे. कृषेका पटेलचा हा पहिलाच म्युझिक व्हिडीओ आहे. कृषेकाने व्हिडीओच्या माध्यमातून प्रेमभंग झाल्यानंतरच्या वेदना उत्तमरित्या मांडल्यात. चॅनल वी मुळे कृषेका प्रकाशझोतात आली होती. 

जगभरात 3000 हून अधिक लाइव्ह शो हरीश मोयलने केले आहेत. या म्युझिक व्हिडीओविषयी बोलताना त्याने सांगितले की, “व्हिडिओसाठी लिहिणं हा स्वतःसाठी एक वेगळाच अनुभव होता. मी दिग्दर्शक सुनील जे. जैन यांचाआभारी आहे ज्यांनी हा विषय व्हिडिओमध्ये इतक्या हलका फुलक्या पद्धतीने मांडला आहे. व्हिडीओच्या शूटिंगसाठी खास लोकेशन निवडण्यात आले होते. त्यावेळी पावसाळाच होता. मढ आयलँड येथे या व्हिडीओचे शूटिंग करण्यात आले होते.मुसळधार पावसात  21 दिवसात शूटिंग पूर्ण करण्यात आले होते.'अधुरी कहानी'  म्युझिक व्हिडीओ संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी अनोखा नजराणा नक्कीच ठरणार आहे. 

Web Title: Music Video 'Adhuri Kahani' shares glimpses of all incidents happened during pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.