बुडालेले पैसे मिळवण्यासाठी संगीतकाराने घेतला सोशल मीडियाचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:01 PM2019-03-20T15:01:27+5:302019-03-20T15:11:53+5:30
संगीतकार नरेंद्र भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट 'नदी वाहते' सिनेमा संदर्भातील आहे.
संगीतकार नरेंद्र भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट 'नदी वाहते' सिनेमा संदर्भातील आहे. ही नरेंद्र भिडे यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''नवीन चित्रपट कधीही न आटणारी, तंत्रज्ञ आणि कलाकारांना त्यांच्या पैशासकट बुडवून दिमाखात वाहणारी नदी.'' या पोस्टमधून संगीतकाराने नदी वाहते या सिनेमातील निर्मात्यांनी पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे. तसेच या पोस्टमध्ये संदीप सावंत यांना देखीलटॅग केले आहे.
नदी वाहते हा सिनेमा 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही पैसे न मिळाल्याचा आरोप संगीतकाराने केला आहे श्वासफेम संदीप सावंत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तसेच संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांनी सहज फिल्म्स या निर्मिती संस्थेने याची निर्मितीदेखील केली होती. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारांत या चित्रपटाला विशेष पुरस्काराने या सिनेमाला सन्मानित करण्यात आलं होते.
'नदी वाहते' सिनेमातून गावातली नदी जगवणं, ती वाहती ठेवणं हे मोठं आव्हान आहे. नदीसाठी केवळ मोर्चे काढून, आंदोलनं करून भागणार नाही. तर, नदीचा योग्य पद्धतीनं वापर करणं ही काळाची गरज आहे, या आशयसूत्रावर 'नदी वाहते' हा सिनेमा बेतला होता.