भाईजानची मुन्नी ६ वर्षांत झाली इतकी मोठी, आता ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:10 PM2021-09-29T14:10:15+5:302021-09-29T14:10:42+5:30

सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपट २०१५ साली रिलीज झाला होता आणि तेव्हा मुन्नी फक्त ७ वर्षांची होती.

My brother's munni became so big in 6 years, now it is difficult to recognize him | भाईजानची मुन्नी ६ वर्षांत झाली इतकी मोठी, आता ओळखणंही झालंय कठीण

भाईजानची मुन्नी ६ वर्षांत झाली इतकी मोठी, आता ओळखणंही झालंय कठीण

googlenewsNext

सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपट २०१५ साली रिलीज झाला होता आणि तेव्हा मुन्नी फक्त ७ वर्षांची होती. आता मुन्नी चांगलीच मोठी झाली आहे. या चित्रपटात मुन्नीची भूमिका हर्षाली मल्होत्राने साकारली होती.

हर्षाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. हे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यावर गेल्या ६ वर्षात मुन्नी किती बदलल्याचे जाणवते आहे. 


बजरंगी भाईजान चित्रपटा आधी हर्षालीने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. यात कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडियाचा समावेश आहे. बजरंगी भाईजान चित्रपटासाठी हर्षालीला स्क्रीन अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला होता. 


हर्षाली इंस्टाग्रामवर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते. तिचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

हर्षाली आता १३ वर्षांची झाली आहे. आता तिची उंची तिच्या आईपेक्षाही जास्त झाली आहे. 


हर्षाली मल्होत्रानेसलमान खानने बजरंगी भाईजान चित्रपटात पाकिस्तानी मुलगी मुन्नीची भूमिका केली होती. जी मुकी असते. मुन्नी रस्ता चुकते आणि पाकिस्तानातून भारतात येते. त्यानंतर भारतात बजरंगी भाईजान म्हणजे सलमान खान मुन्नीला पाकिस्तानात परत पाठवण्यासाठी मदत करतो.

या चित्रपटातील शाहिदाच्या भूमिकेसाठी जवळपास १००० मुलींनी ऑडिशन दिले होते, ज्यातून हर्षालीची निवड झाली होती. बजरंगी भाईजानच्या सेटवर हर्षाली सलमानला मामा अशी हाक मारायची. बजरंगी भाईजान चित्रपटानंतर हर्षाली कोणत्या चित्रपटात काम करताना दिसली नाही.

Web Title: My brother's munni became so big in 6 years, now it is difficult to recognize him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.