"आज खूप मन भरून आलंय...", डॉ. विलास उजवणे यांच्या निधनानंतर मिलिंद गवळींची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:49 IST2025-04-05T10:48:48+5:302025-04-05T10:49:32+5:30

Milind Gawli : अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर डॉ. विलास उजवणे यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे.

''My heart is very full today...'', Milind Gawli's emotional post after the death of Dr. Vilas Ujwane | "आज खूप मन भरून आलंय...", डॉ. विलास उजवणे यांच्या निधनानंतर मिलिंद गवळींची भावुक पोस्ट

"आज खूप मन भरून आलंय...", डॉ. विलास उजवणे यांच्या निधनानंतर मिलिंद गवळींची भावुक पोस्ट

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे (Dr Vilas Ujawane) यांचं वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता आणि त्यावर त्यांनी मातदेखील केली होती. मात्र नंतर हृदयासंबंधी विकार झाल्यामुळे पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्या निधनानंतर सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर डॉ. विलास उजवणे यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता मिलिंद गवळी यांनी डॉ. विलास उजवणे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, डॉक्टर विलास उजवणे, अतिशय गोड स्वभावाचा ऊमदा कलाकार काळाच्या पडद्याआड निघून गेला, आज खूप मन भरून आलं आहे. त्यांच्याबरोबर केलेल्या चित्रपटातलं काम, सगळं डोळ्यासमोरून जातंय, त्यांचा उत्तम अभिनय आठवतोय, त्यांच्याबरोबर मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आठवताय, त्यांचं खळखळून हसणं आठवतंय, खूपच छान स्वभावाचे होते डॉक्टर विलास उजवणे.


त्यांनी पुढे लिहिले की, "खरंतर पंधरा-वीस वर्ष मी त्यांच्या संपर्कात नव्हतो, पण काही महिन्यापूर्वी, मी माझ्या डीएलएलआरने आमच्या शूटिंगच्या दरम्यान क्लिक केलेले त्यांचे फोटोज मला अचानक सापडले आणि मी ते त्यांना व्हॉट्सअॅप वर पाठवले, त्यानंतर आमचं फोनवर सुद्धा बोलणं झालं, त्यांचे मी काढलेले फोटोज बघून त्यांना खूप आनंद झाला होता, बराच वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल कळलं, "ब्रेन स्ट्रोक झाला होता, हार्टचा थोडा इश्शू आहे पण आता मी बरा आहे, आपण लवकरच भेटू या आणि एकत्र काम करूया पण डेली सोप करणं आता मात्र जमणार नाही . आपण एखादा सिनेमा परत करू या" पण आमची भेट काही झाली नाही, परत एकत्र काम करायचं राहून गेलं. आणि आज ही बातमी ऐकून मनाला खूप धक्का बसला."

"एका कलाकाराचं आयुष्य किती नाजूक असतं"

"एका कलाकाराचं आयुष्य किती नाजूक असतं, शरीरात काही बिघाड झाला, तर पुन्हा पूर्ववत येणं किती कठीण जातं, पुन्हा तसंच पूर्वीसारखं काम करणं कठीण जातं,अवघ्या वयाच्या ६२ व्या वर्षी डॉक्टर उजवणे आपल्यातनं निघून गेले. माझ्यासमोर अनेक माझे उत्तम मराठी सहकार कलाकार शरीराने साथ न दिल्यामुळे फार लवकर निघून गेले, अतुल परसुरे ५७, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे ५४, रमेश भाटकर, कुलदीप पवार, सतीश तारे ४८. या सगळ्यांमध्ये अजून भरपूर काम करायची जिद्द होती, इच्छा होती, भरभरून टॅलेंट होतं, पण शरीराने साथ दिली नाही, डॉक्टर विलास उजवणे यांची पण भरपूर काम करायची इच्छा राहून गेली. यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर हे मोठे संकट सहन करण्याचे बळ देवो. शक्ती देवो...", असे मिलिंद गवळींनी पोस्टमध्ये म्हटले.

Web Title: ''My heart is very full today...'', Milind Gawli's emotional post after the death of Dr. Vilas Ujwane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.