'भिकाऱ्यांना माझं नवीन उत्तर', केतकी चितळेनं थेट नेटकऱ्याकडे मागितले ५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:22 PM2022-11-21T12:22:49+5:302022-11-21T12:23:08+5:30

Ketaki Chitale : केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने चक्क इंस्टाग्रामवरील एका युजरला भिकारी म्हटले आहे.

'My new answer to beggars', Ketaki Chitale asked for 5 lakhs directly from the netizen | 'भिकाऱ्यांना माझं नवीन उत्तर', केतकी चितळेनं थेट नेटकऱ्याकडे मागितले ५ लाख

'भिकाऱ्यांना माझं नवीन उत्तर', केतकी चितळेनं थेट नेटकऱ्याकडे मागितले ५ लाख

googlenewsNext

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादग्रस्त विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. फेसबुक आणि इन्स्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे अडचणीतही आली आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे तिला तुरुंगवारीदेखील करावी लागली आहे. दरम्यान पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरील पोस्टमुळे  चर्चेत आली होती. आता तिने इन्स्टाग्रामवर एका युजरला 'भिकारी' संबोधले आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात एक इन्स्टाग्राम युजरने त्याला फॉलो करण्याची विनंती अभिनेत्रीकडे करत आहे. यावर अभिनेत्रीने चक्क त्याच्याकडे ५ लाख रुपये मागितले. केतकीने हा स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले की, 'व्हर्च्युअल आकडा ज्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटतो अशा हताश भिकाऱ्यांना माझे नवीन उत्तर'. केतकीने ही स्टोरी शेअर करत #BeReal असा हॅशटॅगही वापरला आहे.

केतकीने काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर टीका करणारी पोस्ट शेअर केली होती. तिने या पोस्टमध्ये म्हटले होते की, 'मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?' तिच्या या पोस्टवर टीका करणाऱ्यांनाही केतकीने चांगलेच सुनावले होते.

Web Title: 'My new answer to beggars', Ketaki Chitale asked for 5 lakhs directly from the netizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.