पिळदार बॉडी हीच माझी खरी स्टाइल-फ्रेडी दारूवाला
By Admin | Published: December 24, 2016 02:42 AM2016-12-24T02:42:51+5:302016-12-24T02:42:51+5:30
मी अभिनेत्या आधी एक मॉडेल आहे त्यामुळे स्टाइलबाबतही तितकाच परफेक्ट आहे. मला म्युझिक ऐकणं, योगा करणे आवडते.
मी अभिनेत्या आधी एक मॉडेल आहे त्यामुळे स्टाइलबाबतही तितकाच परफेक्ट आहे. मला म्युझिक ऐकणं, योगा करणे आवडते. अभिनय, मॉडेलिंगच्या क्षेत्रात असल्याने मी माझ्या बॉडीवरही विशेष मेहनत घेतो. पिळदार बॉडी कमावण्यासाठीच नाही तर फिट राहण्यासाठी जिममध्ये वर्कआऊट करण्यात मला आवडते. जिममध्ये जास्तीत जास्त वेळ वर्कआऊट करून फक्त पिळदार बॉडीच नाही तर अधिक ताजेतवाने आणि तजेलदार राहण्याचा माझा प्रयत्न असतो. यासाठी जिममधील वर्कआऊट फायदेशीर ठरते असे माझे ठाम मत आहे. कारण जेव्हा बॉडी चांगली बनते त्याचा आपोआप तुमच्या व्यक्तीमत्वावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे चांगली पर्सनालिटी असण्यासाठी चांगली बॉडी असावी असणे गरजेचे आहे. मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे हीच पर्सनालिटी खूप महत्त्वाची असते. अट्रॅक्टीव्ह ड्रेसिग आणि लुक्स यामुळे व्यक्तीमत्त्व उठून दिसते. मात्र फक्त कपडे आणि लूक्सवरुन कुणालाही जज करु नये. स्टाइल ही प्रत्येकातच असते. प्रत्येकजण आपापल्या परीने स्टायलिश राहण्याचा प्रयत्न करतो. मग ते ड्रेसिंग असो किंवा लूक अशा विविध पद्धतीने प्रत्येक व्यक्ती आपली पर्सनालिटी खुलवण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्यांमध्येच काही ना काही स्टाइल असते. फक्त ही स्टाइल प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने मेंटेन करावी लागते.