संग्रामच्या फोटोसेशनमागचे ‘रहस्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 03:29 AM2016-11-14T03:29:13+5:302016-11-14T03:29:13+5:30
देवयानी या मालिकेतून संग्राम साळवी याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संग्रामचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा डायलॉग आजही
देवयानी या मालिकेतून संग्राम साळवी याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संग्रामचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या डोक्यात एकदमच फिट बसला आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या कलाकाराच्या हटके लुक असलेल्या फोटोसेशनची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे. त्याच्या या हटके लुकविषयी संग्राम लोकमत सीएनएक्सला सांगतो, की सध्या सरस्वती या मालिकेमध्ये मी याच लुकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. माझ्या या हटके लुक असलेल्या फोटोसेशनमागे एक ‘राज’ आहे. तो राज म्हणजे काही दिवसांतच हे लांब केस मी कट करणार आहे. त्यामुळे लांब केस व मिशा असलेला लुकची आठवण राहावी म्हणून हे सुंदर फोटोसेशन केले आहे. कारण, यापूर्वी मी कधीच लांब केस व मिशा असलेला लुक केला नव्हता. त्यामुळे हे फोटोसेशन करण्याचे ठरविले. माझ्या या हटके लुकचे फोटोसेशन ठाणे येथे करण्यात आले आहे. माझी मैत्रीण स्वप्नाली पलांडे हिने हे सुंदर फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत. असे हे ३० ते ३५ फोटो तासाभरात क्लिक करण्यात आले आहेत. अशा या फोटोसेशनला खूप मजा व धमाल केली. संग्रामच्या या फोटोसेशनला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स मिळतानादेखील दिसत आहे.