नागराज मंजुळे 'या' सिनेमाच्या प्रेमात, पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:20 PM2021-11-10T15:20:24+5:302021-11-10T15:21:43+5:30

मागील आठवड्यात जयंती सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर जारी करण्यात आला आणि सहा दिवसात तब्बल १२ लाखाच्या वर लोकांनी ट्रेलर पहिला आहे तसेच पसंतीदेखील दिली आहे.

Nagraj Manjule in love with Jayanti Marathi Movie, best wishes for sharing posters | नागराज मंजुळे 'या' सिनेमाच्या प्रेमात, पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

नागराज मंजुळे 'या' सिनेमाच्या प्रेमात, पोस्टर शेअर करत दिल्या शुभेच्छा !

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीत ज्यांचं नाव आज अभिमानानं घेतलं जातं असे दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे नेहमीच कलेमार्फत वेगवेगळया सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. "फँड्री", "सैराट", "नाळ" तसेच "पावसाचा निबंध" या त्यांच्या अफलातून कलाकृतींना प्रेक्षकवर्गांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. उत्तम कथानकाचे जाणकार नागराज मंजुळे यांनी आज सकाळी सर्वत्र चर्चित असलेला मराठी चित्रपट "जयंती" चा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेयर करत जयंतीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

फेसबुकवर जयंतीचे "बॅज" लावून तयार केलेले स्वतःचे पोस्टर व्हायरल करणं, ताल धरायला लावणाऱ्या या सिनेमाच्या गाण्यांचे रिल्स बनवून ते व्हायरल करणारे तरुणवर्ग आणि प्रसारमाध्यमांमधल्या चर्चा अशा प्रकारे वेगवेगळया मार्गांनी आगामी मराठी चित्रपट "जयंती" गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्याचं उत्सुकता वाढवत आहे. शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित "जयंती" सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मागील आठवड्यात जयंती सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर जारी करण्यात आला आणि सहा दिवसात तब्बल १२ लाखाच्या वर लोकांनी ट्रेलर पहिला आहे तसेच पसंतीदेखील दिली आहे.  सिनेमाच्या २ गाण्यांना देखील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. "जयंती" सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता "ऋतुराज वानखेडे" आणि अभिनेत्री "तितिक्षा तावडे" मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत, तर त्याचप्रमाणे  सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत. कलेचे जाणकार नागराज मंजुळे यांनी खुद्द जयंतीबद्दल केलेल्या कौतुकामुळे मराठी सिनेरसिकांसाठी आता चित्रपट निवडीच्या यादीत जयंती अव्वल असेल यात तिळमात्र शंका नाही.

Web Title: Nagraj Manjule in love with Jayanti Marathi Movie, best wishes for sharing posters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.