'झुंड' फारसा चालला नाही कारण...पहिल्या बॉलिवूड सिनेमाबद्दल नागराज मंजुळेंनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 11:28 AM2023-04-05T11:28:56+5:302023-04-05T11:30:22+5:30

नागराज मंजुळेंचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा 'झुंड' पडद्यावर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

nagraj manjule reveals why movie didnt do well on box office | 'झुंड' फारसा चालला नाही कारण...पहिल्या बॉलिवूड सिनेमाबद्दल नागराज मंजुळेंनी केला खुलासा

'झुंड' फारसा चालला नाही कारण...पहिल्या बॉलिवूड सिनेमाबद्दल नागराज मंजुळेंनी केला खुलासा

googlenewsNext

नेहमी हटके चित्रपट बनवणारे नागराज मंजुळे सध्या आगामी 'घर बंदुक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनदरम्यान ते अनेक ठिकाणी मुलाखत देत असून एके ठिकाणी त्यांना 'झुंड' (Jhund) ला मिळालेल्या कमी प्रतिसादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर नागराज अण्णांनी पहिल्यांदाच स्पष्ट उत्तर दिलं आहे.

नागराज मंजुळेंचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा 'झुंड' पडद्यावर फारशी कमाल दाखवू शकला नाही. सिनेमात खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका होती तर नागराज अण्णांनीच सिनेमा दिग्दर्शित केला होता. सिनेमाची माऊथ पब्लिसिटी चांगली झाली तसंच क्रिटिक्सलाही सिनेमा पसंतीस पडला. मात्र तरी बॉक्सऑफिसवर सिनेमा फार कमाई करु शकला नाही. यावर नागराज मंजुळे म्हणाले, 'हे खरंय की 'झुंड'ला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तो काळही तसा होता तेव्हा सगळे कोरोनामुळे त्रस्त होते. तसंच चित्रपटाचं नीट प्रमोशनही झालं नाही. जास्तीत जास्त लोकांनी चित्रपट बघितला असता तर त्यांना नक्कीच आवडला असता. पण जास्त लोकांपर्यंत सिनेमा पोहोचू शकला नाही. सगळेच कोरोनासारख्या संकटाचा सामना करत होते.'

नागराज पुढे म्हणाले, 'त्यावेळी इतरही काही सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्याच आठवड्यात ३ मोठे चित्रपट रिलीज झाले होते. असं नाही की त्याकाळात कोणतेच सिनेमे चालले नाहीत. काही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली. 'झुंड'नेही चांगली कमाई केली पण आकडा आणखी वाढू शकला असता.'

निवृत्त खेळ प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. 4 मार्च 2022 रोजी सिनेमा रिलीज झाला होता. आता नागराज मंजुळेंचा 'घर बंदुक बिरयानी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: nagraj manjule reveals why movie didnt do well on box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.