'सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे भुरळ घालणारी, भविष्यात चित्रीकरणासाठी विचार' नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 09:24 PM2022-05-08T21:24:31+5:302022-05-08T21:27:15+5:30

Nagraj Manjule News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ही भुरळ घालणारी आहेत भविष्यात गोव्यात चित्रिकरण करत असतना सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही प्राधान्य देणार असल्याचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.

Nagraj Manjule's reaction on Sindhudurg Tourism | 'सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे भुरळ घालणारी, भविष्यात चित्रीकरणासाठी विचार' नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

'सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे भुरळ घालणारी, भविष्यात चित्रीकरणासाठी विचार' नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

- अनंत जाधव 
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ही भुरळ घालणारी आहेत भविष्यात गोव्यात चित्रिकरण करत असतना सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही प्राधान्य देणार असल्याचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.

सावंतवाडीत जनवादी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मंजुळे सावंतवाडीत आले होते.यावेळी त्यांनी लोकमत शी संवाद साधला. मंजुळे म्हणाले,मी अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेलो पण आजचा दिवस अभूतपूर्व असाच आहे.केशवसुत कट्ट्यावर ही गेलो तेथील तुतारी बघितली मात्र आज कुंटूबा समवेत असल्याने कार्यक्रम संपल्यानंतर परतणार असाच कार्यक्रम आहे मात्र मात्र येथील निर्सगाच्या मी प्रेमात पडलो असून सुंदर पर्यटन स्थळे असल्याने भविष्यात चित्रीकरण करत असतना गोव्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करेन असे ही मंजुळे यांनी सांगितले.

आपल्या नव्या चित्रपटा बाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही पण मला येथील निर्सग आवडला असे सांगत प्रत्येकाला निर्सग भुरळ घालत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Web Title: Nagraj Manjule's reaction on Sindhudurg Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.