प्रमोशन का नाम गाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 02:13 AM2017-01-28T02:13:16+5:302017-01-28T02:13:16+5:30

किंग खान शाहरुख आणि रेल्वेचे नातं काही वेगळंच आहे, हे त्याच्या फॅन्सना माहितीच आहे. मग ते छैय्या छैय्या गाणे असो किंवा मग दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमातील

Name the promotion car! | प्रमोशन का नाम गाडी!

प्रमोशन का नाम गाडी!

googlenewsNext

किंग खान शाहरुख आणि रेल्वेचे नातं काही वेगळंच आहे, हे त्याच्या फॅन्सना माहितीच आहे. मग ते छैय्या छैय्या गाणे असो किंवा मग दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमातील प्रसिद्ध ‘जा सिमरन जा सिमरन’ संवादावेळी घडणारा सीन असो. आता पुन्हा एकदा रेल्वे आणि शाहरुखचा संबंध आला. निमित्त ठरले आहे ते बादशाहच्या आगामी रईस सिनेमाचं. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने रेल्वेचाच आधार घेतला. मात्र रेल्वेमधून प्रमोशन करणारा शाहरुख हा काही पहिला अभिनेता नाही. याआधी अनेकांनी रेल्वेतून प्रमोशन केले आहे. अशा प्रमोशनमुळे थेट प्रचंड गर्दीशी कनेक्ट होता येत असल्याने हा फंडा दिवसेंदिवस हिट होतोय. खालील सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी रेल्वेचा वापर झाल्याने प्रमोशन का नाम गाडी म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
बार बार देखो
‘बार बार देखो’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या सिनेमाचे कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांनी रेल्वेचा आधार घेतला. कोलकातामध्ये एका ट्रेनमधून सिद्धार्थ आणि कॅटने प्रवास केला. इतकंच नाही तर या सिनेमातील काला चष्मा या गाण्यावरही दोघांनी ट्रेनमध्येच ताल धरला. हे पाहून ट्रेनमधील प्रवाशांनीसुद्धा या दोन्ही कलाकारांसह ठेका धरला.
24 झ्र सीझन 2
झक्कास स्टार अभिनेता अनिल कपूरच्या 24 या सिरीजला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळेच त्याच्या 24 सिरीजच्या दुसऱ्या सीझनची रसिकांना उत्सुकता होती. सीझन 2 सुरू होण्याआधी अनिल कपूरनेही त्याच्या प्रमोशनसाठी रेल्वेचाच मार्ग स्वीकारला. या वेळी अनिल कपूरने मुंबईतल्या लोकलमधून प्रवास केला. या वेळी तो इतका उत्साहित होता की त्याने लोकलमध्ये लटकून प्रवास केला. त्याचा हा अतिउत्साह त्याला चांगलाच भोवला. कारण पश्चिम रेल्वेने अनिल कपूरच्या स्टंटमुळे संबंधित प्रॉडक्शन हाऊसला नोटीस बजावली.
तेरी मेरी कहानी
अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचा तेरी मेरी कहानी हा सिनेमा. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहिद आणि पिग्गी चॉप्सनं मुंबई लोकलनं प्रवास केला.
तमाशा
किंग खान शाहरुखप्रमाणे दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या सिनेमातही रेल्वेचा काही ना काही रोल असतोच असतो. मग ते जब वी मेट असो किंवा मग लव आज कल किंवा मग तमाशा. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण स्टारर तमाशा या सिनेमाचं प्रमोशन तर इम्तियाजने थेट ट्रेनमधूनच केलं. यावेळी रणबीर, दीपिका आणि खुद्द इम्तियाज यांनी राजधानी एक्स्प्रेसमधून मुंबई ते दिल्ली प्रवास केला होता.
हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ
अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ हा सिनेमा. या सिनेमाच्या पब्लिसिटीही ट्रेननं करण्यात आली. मात्र ही मेट्रो ट्रेन होती. त्या वेळी मुंबईत नुकतीच मेट्रोची सुरुवात झाली होती. त्यामुळे मुंबईकरांमध्ये मेट्रोचं कुतूहल होतं. हीच बाब लक्षात घेऊन आलिया आणि वरुणनं मेट्रोनं प्रवास करत सिनेमाचं प्रमोशन करण्याचं ठरवलं. त्या वेळी आलियाला पायाला जखम झाली होती. तरीही त्याची पर्वा न करता आलियानं वरुणसह मेट्रोनं प्रवास केला.
तीस मार खान
खिलाडी अक्षय कुमारच्या तीस मार खान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ट्रेनचा मोलाचा वाटा होता. या सिनेमाचं म्युझिक ट्रेनमध्येच लॉन्च करण्यात आलं होतं. यासाठी खिलाडी अक्की आणि कॅटरिना कैफ यांनी मुंबई ते लोणावळा असा ट्रेन प्रवास केला होता.

Web Title: Name the promotion car!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.