सुनील दत्त यांनी दिलेल्या साड्या नाही नेसल्या होत्या नरगिस यांनी, हे आहे या मागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 08:00 PM2019-06-23T20:00:00+5:302019-06-23T20:00:00+5:30
नरगिस दत्त यांना साड्या खूप आवडायच्या म्हणून सुनील दत्त यांनी त्यांना खूप साड्या भेट म्हणून दिल्या होत्या. मात्र त्या साड्या नरगिस यांनी परिधान केली नाही.
सुनील दत्त यांनी आपल्या विनोदी व रोमँटिक अंदाजाने ६० व ७०च्या दशकात प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली होती. त्यांनी अभिनेत्री नरगिस यांच्यासोबत लग्न केले होते. खासगी जीवनासोबत व्यावसायिक जीवनात त्यांनी बरेच चढउतार पाहिले. बऱ्याच अडचणींचा सामना केल्यानंतरही कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दुःख पहायला मिळालं नाही. राजकीय प्रवासात देखील त्यांना खूप यश मिळालं.
सुनील दत्त यांचा जन्म ६ जून, १९२९ साली पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील खुर्दी गावात झाला होता. त्यांचे खरे नाव बलराज दत्त होते. सुनील दत्त यांनी आपल्या करियरची सुरूवात रेडिओपासून केली होती. ते रेडिओ सेयलॉनमध्ये हिंदीतील सर्वात प्रसिद्ध अनाउंसर होते. मात्र त्यांना अॅक्टर व्हायचे होते. त्यांनी हिंदी चित्रपटात अभिनय करायचे मनाशी पक्के केले आणि स्वप्ननगरी मुंबईत दाखल झाले. सुनील दत्त यांनी १९५५ साली रेलवे प्लॅटफॉर्म सिनेमातून आपल्या सिने कारकीर्दीला सुरूवात केली होती.
सुनील दत्त यांचे नरगिस दत्त यांच्यावर खूप प्रेम होते. ते नेहमी त्यांची काळजी घेत असत. नरगिस यांना साड्यांची खूप आवड होती. त्यांच्याकडे साड्यांचे खूप चांगले कलेक्शन होते. लग्नानंतर जेव्हा सुनील दत्त यांना समजले की नरगिस यांना साड्यांची खूप आवड आहे. ते त्यांच्यासाठी साड्या घेऊन जायचे.
नरगिस देखील खूश व्हायच्या की ते त्यांच्यासाठी साडी घेऊन आले. पण हैराण करणारी बाब म्हणजे त्या सुनील दत्त यांनी आणलेल्या साड्या नेसायच्या नाहीत. ही बाब सुनील दत्त यांनी नोटीस केली आणि नरगिस यांना विचारले. त्यावर त्यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र पुन्हा त्या गोष्टीवर सुनील दत्त यांनी जोर देत विचारलं की, मी आणलेल्या साड्या का नाही नेसत? त्यावर नरगिस दत्त यांनी उत्तर दिलं की, त्यांनी आणलेल्या साड्या त्यांना आवडत नाहीत. मात्र नरगिस दत्त यांनी त्या साड्या सांभाळून ठेवल्या होत्या. मी आणलेल्या साड्या नरगिस यांना आवडत नाहीत, हे समजल्यावर सुनील दत्त यांना वाईट वाटले. पण नरगिस दत्त यांनी गिफ्ट म्हणून दिलेल्या साड्या सांभाळून ठेवल्या म्हणून त्यांना खूप बरे वाटले.
सुनील दत्त व नरगिस यांची भेट दो बीघा जमीनच्या वेळी झाली होती. यानंतर सुनील दत्त यांना नरगिस आवडू लागल्या. त्या दोघांनी एकत्र मदर इंडिया चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली होती आणि या आगीत नरगिस दत्त अडकल्या होत्या. सुनील दत्त यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नरगिस यांना वाचवलं होतं.